जांभळ्या रंगाचे असे बटाटे कधी खाल्लेत का? आरोग्यासाठी मिळतात फायदे

जांभळ्या बटाट्याची कातडी जांभळ्या रंगाची असते आणि त्याची थोडी वेगळी चव असते. दक्षिण अमेरिकेतील एका भागात आढळणारा जांभळा बटाटा भारताच्या बाजारपेठेत कमी प्रमाणात आढळतो. पण जांभळे बटाटे सुपर मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात. जांभळ्या बटाट्याचा पोत सामान्य बटाट्यासारखाच असतो, पण पौष्टिकतेचा विचार केला तर ते पांढऱ्या बटाट्यापेक्षा जास्त फायदेशीर असतात. जांभळ्या बटाट्यातील पौष्टिकतेबद्दल बोलायचे झाले तर त्यात स्टार्चचे प्रमाण कमी असते. ते खाण्याचे काय फायदे आहेत आणि ते कसे शिजवले जातात, याविषयी जाणून घेऊया.

जांभळे बटाटे खाण्याचे फायदे –

कर्करोगाचा धोका –

स्टाईलक्रेस च्या मते, जांभळ्या बटाट्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. यामुळे पेशींमध्ये ट्यूमर तयार होण्याचा धोका देखील कमी होऊ शकतो. या बटाट्याचे सेवन केल्याने आतडे, कोलन इत्यादींमध्ये ट्यूमर बनण्याची शक्यता 50 टक्के कमी होऊ शकते, असे संशोधनातून समोर आले आहे.

रक्तदाब नियंत्रणात –

जांभळा बटाटा उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. जांभळ्या बटाट्याच्या सेवनाने सिस्टोलिक रक्तदाब 3 टक्के आणि डायस्टोलिक रक्तदाब सुमारे 4 टक्के कमी होऊ शकतो.

पचन व्यवस्थित होतं –

जांभळ्या बटाट्यामध्ये पॉलिफेनॉल असतात. जे पोट निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.

यकृतासाठी उपयोगी-

जांभळ्या बटाट्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे यकृत निरोगी राहते. हा बटाटा खाल्ल्याने अँटिऑक्सिडंट क्रिया वाढते, ज्यामुळे यकृतावरील चरबी कमी होते.

जांभळा बटाटा कसा खावा –

ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला जांभळे बटाटे, लसूण, मीठ, मिरपूड, ओवा लागेल. या सर्व गोष्टी एका भांड्यात घेऊन फोडणीच्या गोष्टींनी फोडणी द्या, नंतर त्यात हा बटाटा घाला. वेळोवेळी परतत राहा, पाणी, तिखट आपल्या चवीनुसार घाला आणि ते मऊ होईपर्यंत गॅसवर शिजवा. नंतर उशीर न करता गरमागरम सर्व्ह करा.

जांभळा बटाटा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. याच्या सेवनाने अनेक आजार दूर ठेवता येतात, पण आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. Sdnewsonline त्याची हमी देत नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.