यंदा श्रावण महिना 29 जुलैपासून सुरू होणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण हा पाचवा महिना आहे. श्रावण महिना सुरू झाला की सर्वत्र निसर्गरम्य वातावरण असते. तसेच या महिन्याला धार्मिक महत्त्व देखील आहे. श्रावणात महादेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. उत्तर भारतासाठी 14 जुलै रोजी सुरू होईल तर महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील लोक 29 जुलैपासून श्रावण महिना साजरा करतील.
श्रावण महिन्याचे महत्व
श्रावण महिन्यात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी मोठी तपश्चर्या केली होती, त्यामुळे हा महिना महादेवाला अतिशय प्रिय आहे अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यात सोमवारी महादेवाची आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा करताना जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्यालाही विशेष महत्त्व आहे. ज्यांना या दिवशी पूजा करणे शक्य नसेल ते मनोभावे बेलपत्र वाहू शकता, असे केल्यानेही शिवपूजेचे पुण्य प्राप्त अशी मान्यता आहे.
यंदा श्रावण महिन्यात किती सोमवार आहेत?
श्रावण महिन्यात अनेकदा 5 सोमवार देखील असतात, परंतु यंदा श्रावण महिन्यात 4 सोमवार आहेत.
– पहिला श्रावण सोमवार – 01 ऑगस्ट 2022
– दुसरा श्रावण सोमवार – 08 ऑगस्ट 2022
– तिसरा श्रावण सोमवार – 15 ऑगस्ट 2022
– चौथा श्रावण सोमवार – 22 ऑगस्ट 2022
कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ?
श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवमूठ वाहण्याची विधी आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी वेगळी शिवमूठ वाहिली जाते. जाणून घेऊया कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ महादेवाला वाहावी?
– पहिला श्रावण सोमवार – तांदूळ
– दुसरा श्रावण सोमवार – तीळ
– तिसरा श्रावण सोमवार – मूग
– चौथा श्रावण सोमवार – जवस