इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. टॅक्सपेयर्स आर्थिक वर्ष 2021-22 किंवा मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी ई-फायलिंग पोर्टलवर आयकर रिटर्न दाखल करू शकतात. सरकारने यावर्षी ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै निश्चित केली आहे. देशातील मोठी संख्या अजूनही आयटीआर भरत नाही. याची अनेक कारणे आहेत. यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे याचे फायदे तोटे माहित नसणे. तुमचं उत्पन्न कितीही असलं तरी आयटीआर भरणे किती महत्त्वाचं आहे, हे आज तुमच्या लक्षात येईल.
सहज बँक कर्ज मिळवा
बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्था आयटीआर पावतीला सर्वात विश्वासार्ह उत्पन्नाचा पुरावा मानतात. जर तुम्ही ITR भरत असाल आणि भविष्यात तुम्ही कार, कर्ज किंवा गृहकर्ज यासह कोणत्याही प्रकारचे कर्ज घेत असाल तर ITR तुम्हाला खूप मदत करेल आणि तुम्हाला सहज कर्ज मिळेल.
TDS परताव्यासाठी आवश्यक
तुमचे उत्पन्न आयकराच्या कक्षेत येत नसले तरीही TDS कापला जातो. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही ITR दाखल करता तेव्हाच तुम्हाला परतावा मिळेल. आयटीआर दाखल केल्यानंतरच प्राप्तिकर विभाग हे मूल्यांकन करतो की तुम्ही यात मोडता की नाही. जर तुम्ही रिफंडमध्ये येत असाल तर तुम्हाला परतावा मिळतो. विभाग त्यावर प्रोसेस करून तुमच्या बँक खात्यात रिफंड केला जातो.
व्हिसा मिळणे सोपे
अनेक देश व्हिसा देताना लोकांना त्यांच्या उत्पन्नाचा पुरावा विचारतात. आयटीआर पावत्या हा तुमच्या उत्पन्नाचा ठोस पुरावा आहे. यामुळे तुम्ही भेट देऊ इच्छित असलेल्या देशाच्या अधिकाऱ्यांना, तुमच्या उत्पन्नाची माहिती मिळते. तुम्ही संबंधित देशात फिरण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात, हे तुमच्या आयटीआर पावत्या पाहून खात्री होते.
उत्पन्न आणि अॕड्रेस पुरावा
आयटीआर हे उत्पन्न आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. सरकारी काम असो किंवा खाजगी, तुम्ही आयटीआरची प्रत उत्पन्नासाठी किंवा पत्त्याच्या पुराव्यासाठी देऊ शकता. त्यामध्ये तुमचे उत्पन्न आणि राहण्याचा पत्ता इत्यादीचा संपूर्ण तपशील असतो.
लॉस सेट ऑफ करण्यात मदत
शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही आयटीआर खूप उपयुक्त आहे. यात नुकसान झाल्यास, तोट्याला पुढील वर्षासाठी फॉरवर्ड करुन आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. पुढील वर्षात भांडवली नफा झाल्यास, तोटा नफ्याच्या तुलनेत अॕडजस्ट केला जाईल आणि यामुळे तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळेल.