कर्तारपूर कॉरिडॉर खूला करावा, पाकिस्तानची भारताला विनंती

भारताने पुन्हा एकदा आपल्या बाजूने कर्तारपूर कॉरिडॉर खूला करावा असे आवाहन पाकिस्तानने भारताला केले आहे. कर्तारपूर हे शिख धर्मीयांचे पवित्र स्थळ आहे, त्यांना गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त कर्तारपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी असे पाकिस्तानने म्हटले आहे. याबाबत पाकच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी 9 नोव्हेंबर 2019 मध्ये गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंती निमित्त कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन केले होते. कर्तारपूर कॉरिडॉरमुळे भारतातील शिख बांधवांना पवित्र स्थळ असलेल्या कर्तारपूरला जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच जगभरात कोरोना महामारीने थैमान घातल्याने हा मार्ग बंद कण्यात आला.

याबाबत बोलताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आतापर्यंत भारताने आपल्या बाजूने कर्तारपूर कॉरिडॉर सुरू केलेला नाही. कर्तारपूरमध्ये गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त येत्या 17 ते 26 नोव्हेंबरदरम्यान मोठा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करून शिख बांधवांना कर्तारपूरमध्ये येण्याची परवानगी द्यावी. पाकिस्तान येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे.

त्यापूर्वी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी मंगळवारी पंजाबस्थित नमध्ये असलेल्या डेरा बाबा नानकला भेट दिली. त्यांनी भारत पाक सीमेवरूनच पाकिस्तानमध्ये असलेल्या कर्तारपूर साहिबचे दर्शन घेत, प्रार्थना केली. प्रार्थनेनंतर बोलताना ते म्हणाले की, आता दोनही देशांनी कर्तारपूर कॉरिडॉर पुन्हा एकदा सुरू करावा, ज्यामुळे शिख बांधवांना कर्तारपूरला जाऊन दर्शन घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.