सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पावसामुळे निर्सगाचे सौंदर्य खुलले आहे.यामुळे अनेक जण पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. मात्र, यातच एक वाईट बातमी समोर आली आहे. पर्यटनाला गेलेल्या एका तरुणाच्या अंगलट आले आहे.
राज्यात सर्वत्र जोरदार होत असलेल्या पावसाचा पर्यटक आनंद घेत आहेत. मात्र, लोणावळ्यात वर्षा विहारासाठी आलेला पर्यटक भुशी धरणात बुडाला आहे. साहिल सरोज, असे धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. साहिल सरोज हा तरुण त्याच्या इतर सहकाऱ्यांसह लोणावळ्यात आला होता. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्याखाली साहिल वर्षाविहाराचा आनंद घेत होता. मात्र, याचवेळी त्याचा पाय घसरला आणि तो थेट भुशी धरणात बुडाला आहे. घटनास्थळी शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि लोणावळा पोलीस दाखल झाले आहेत. धरणातील पाण्यात साहिलचा शोध सुरू आहे.