देशातील प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकारांपैकी एक असलेले संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांनी जगाचा निरोप घेतला. पंडित शर्मा यांचं 10 मे ला पाली हिल येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पंडित शर्मा यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंडित शर्मा यांच्यावर 11 मे ला कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळेस मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी पंडित शिव कुमार यांचे जवळचे आणि साथीदार असलेले तबला वादक झाकीर हुसैन हे देखील उपस्थित होते. आपला जवळचा मित्र गमावल्याचं भाव त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसत होता. या दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
झाकीर हुसेन अंत्यसंस्कारादरम्यान पंडित शिवकुमार शर्मा यांच्या चितेकडे एकटक स्तब्ध पाहत होते. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोत झाकीर हुसेन यांनी पांढरा कुर्ता परिधान केलेला दिसून येतोय. आपल्या अनेक वर्षांपासूनचा जवळचा मित्र गमावल्याचा भाव हुसेन यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. संयुक्ता चौधरीच्या ट्विटर पेजवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे.
नेटकऱ्यांनी हा फोटो पाहून सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काही जण या फोटोला ‘देशाचं खरे चित्र’ असल्याचं सांगतायेत. तर काही या फोटोला ‘धर्मनिरपेक्षतेचे उदाहरण’ असं सांगातायेत.
पंडित शिवकुमार शर्मा यांच्या विषयी जाणून घ्या अधिक येथे :
https://upscgoal.com/shiv-kumar-sharma-bio-and-fact-in-hindi/