श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचा नवा नियम सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय, कारण पहिल्यासारखी खेळाडुांना ट्विटरवरून किंवा इतर माध्यमातून निवृत्ती जाहीर करता येणार नाही.
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या दोन खळाडुंनी तीन दिवसात निवृत्ती जाहीर केल्याने मोठा झटका बसला आहे, फलंदाज भानुका राजपक्षा आणि दानुष्का गुणतिलका ने अलिकडेच अचानक निवृत्ती घेतली आहे. या अचानक झालेल्या निवृत्तीने अनेकांना धक्का बसला आहे. काही दिवसातच टीमधील महत्वपूर्ण खेळाडू बाहेर गेले आहेत, त्यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डही संकटात सापडला आहे. या अचानक निवृत्तींच्या घोषणानंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्ड कॉर्पोरेट नियमांकडे वळले आहे. कोणत्याही खेळाडून निवृत्ती घेण्यापूर्वी काही महिने आगोदर बोर्डाला नोटीस देणे गरजेचे आहे, असा नवा नियम काढला आहे. त्याचबरोबर निवृत्ती घेणाऱ्या खाळाडुंसाठी नवी नियमावलीही लागू करण्यात आली आहे.
शविनारी बोर्डाने कार्यकारी समितीच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेतले, त्यामध्ये कोणत्याही खेळाडुला निवृत्ती घ्यायची असल्यास तीन महिने आधी नोटीस देणे बंधनकारक असणार आहे. एवढेच नाही तर खेळाडु निवृत्त झाल्यानंतर सहा महिन्यांनी त्याला विदेशी क्रिकेट लीग खेण्यासाठी परवानगी प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच निवृत्त झालेल्या खेळाडुला श्रीलंकेत खेळण्यासाठीही काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत.