कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय

वातावरणात झालेला बदल, धुके आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून काही स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दाट धुक्यांमुळे दृष्यमानता कमी झाल्याने अनेकदा ट्रेनला नियोजित स्थळी पोहोचण्यास उशीर होतो. तसेच देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेविभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून आता काही स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. त्याचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.

वेळापत्रकानुसार रेल्वेगाडी क्रमांक 09524 ही स्पेशल ट्रेन दिल्ली रोहिल्ला -ओखा मार्गावर चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन 12 फेब्रुवारीपासून 23 फेब्रुवारीपर्यंत एकूण सात ट्रिप करणार आहे. ही ट्रेन या कालावधीमध्ये प्रत्येक बुधवारी दिल्लीवरून दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी निघेल आणि गुरुवारी दुपारी 13.50 वाजता नियोजित स्थळी पोहोचेल. ही ट्रेन द्वारका, खंभालिया, जामनगर, हापा, राजकोट, सुरेंद्रनगर, वीरमगाम, मेहसाणा, उंझा, सिद्धपूर, पालनपूर, आबूरोड, फालना, मारवाड, ब्यावर, अजमेर, जयपूर, गांधीनगर, बांदीकुई, अल्वर या मार्गावर थांबणार आहे.

दरम्यान सध्या नागपूर रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या राजनांदगाव आणि कलमनादरम्यान तीसऱ्या रेल्वे लाईनचे काम चालू आहे. याचा परिणाम हा रेल्वे वाहतुकीवर झाला असून, या मार्गाचे काम सुरू असल्यामुळे रायपूर -बिलासपूरदरम्यान धावणाऱ्या आठ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या ट्रेन येत्या 11 जानेवारीपर्यंत रद्द असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. यासोबतच अन्य काही मार्गावर देखील लवकरच स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांकडून मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.