सध्या राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे.मुसळधार पावसाने अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही ठिकाणी प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. यातच आता हवामान खात्याने पुढील चार दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने काय म्हटलं –
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम किनार्यावरील पूर्व-पश्चिम शियर, मान्सून ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे स्थित होत आहे. यामुळे परिणामी 4-5 दिवसात मुंबई, ठाण्यासह, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. तसेच मराठवाड्यातही या दिवसात पावसाचा जोर दिसणार आहे.
नाशिकमध्ये मंदिरे बुडाली –
नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पाऊस होत आहे. यामुळे गोदावरी नदीखाली विविध मंदिरे बुडाली आहेत. 6 ते 7 जुलैपासून पुढचे काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार जिल्ह्यात पाऊस झाला. यासंबंधीचे व्हिडिओही व्हायरल होत आहे.