मुंबई-गोवा महामार्गावर बसचा भीषण अपघात, दिवाळीनिमित्त गावी जाताना 46 प्रवाशांचा जीव धोक्यात

पनवेल तालुक्यातील महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे चौकीजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ठाणे-सांगली बस क्रमांक एम एच 40 एन 9164 गंभीर अपघात होऊन भरलेली बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कोण पुलावरून महामार्गावर जाताना वळण घेत असताना चालकाचं बस वरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्यावरून खाली झाडांमध्ये पलटी झाली. यावेळी बस प्रवाशाची खचून भरली होती.

दिवाळी सणासाठी चाकरमानी मुंबईहून गावी जाण्यासाठी या बसमधून प्रवास करत होते. या बसमधून तब्बल 46 प्रवासी प्रवास करत होते.  अपघातानंतर सर्व प्रवासी बस मध्येच अडकून पडले. महामार्ग पोलीस केंद्राला घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसच्या पाठीमागील काचा फोडून प्रवासी तसेच त्यांचे सामान बाहेर काढण्यात आलं.

या अपघातात आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत. तसंच बस चालक देखील गंभीर जखमी असून त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी आय आर बी रुग्णवाहिकेने एमजीएम कळंबोलीतील दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. महामार्ग पोलिसांनी तात्काळ मदत करत सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप बाहेर काढलं. भांबावलेल्या प्रवाशांना आधार देण्याचं मुलाचं कार्य महामार्ग पोलिसांनी केलं प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून त्यांना पर्यायी वाहनांची देखील व्यवस्था करून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.