स्पाईसजेटचे विमान विजेच्या खांबाला धडकले

दिल्ली विमानतळावर स्पाईसजेटचे विमान विजेच्या खांबाला धडकले. या अपघातामध्ये विमान आणि खांबांचे मोठे नुकसान झाले आहे. ही टक्कर पुशबॅक दरम्यान घडली म्हणजेच हे विमान पॅसेंजर टर्मिनलवरून धावपट्टीवर नेले जात होते त्यावेळी हा अपघात घडला. अपघाताबाबत बोलताना विमानतळ अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली विमानतळावर विमानाच्या पुशबॅक दरम्यान स्पाईसजेटचे विमान विजेच्या खांबाला धडकले. या अपघातामध्ये विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर प्रवाशांसाठी विमान बदलण्यात आले.

दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, चौकशी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्पाईसजेटचे विमान एसजी 160 हे दिल्लीवरून जम्मूला जाणार होते. याचदरम्यान हा अपघात घडला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, स्पाईसजेटचे विमान एसजी 160 हे दिल्लीवरून जम्मूला जाणार होते. याचदरम्यान हा अपघात घडला. ही टक्कर पुशबॅक दरम्यान घडली म्हणजेच हे विमान पॅसेंजर टर्मिनलवरून धावपट्टीवर नेले जात होते त्यावेळी हा अपघात घडला. अपघातानंतर प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली असून, विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

अपघातामध्ये विमानाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. विमान खांबाला धडकले. विमान खांबाला धडकल्यानंतर विजेचा खांब देखील वाकला. अपघातानंतर प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.