१८ जुलै २०२२ रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे.
संयुक्त विरोधी पक्षाने यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्याचवेळी एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनवले आहे.
हे दोन्ही नेते दीर्घकाळ राजकारणात असून त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. मात्र, राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असणाऱ्या या उमेदवारांचे नेमके शिक्षण किती झाले आहे माहिती आहे का? नसेल तर घ्या जाणून.
बिहारमधील पाटणा येथील कायस्थ कुटुंबात जन्मलेल्या यशवंत सिन्हा यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, त्यांनी १९५२ मध्ये पाटणा कॉलेजिएट स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले.
यानंतर त्यांनी १९५८ मध्ये राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. ते १९६२ पर्यंत पाटणा विद्यापीठात राज्यशास्त्राचे शिक्षक होते.
यशवंत सिन्हा हे आयएएस अधिकारी होते. तीन वेळा लोकसभेचे खासदार असण्यासोबतच ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार आणि अर्थमंत्रीही राहिले आहेत.
दुसरीकडे, जर आपण एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल बोललो तर त्यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात झाला.
द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वरच्या रमा देवी महिला महाविद्यालयातून कला शाखेत पदवी घेतली आहे. त्याचे शालेय शिक्षणही ओडिशामध्ये झाले आहे.
ओडिशातील रायरंगपूरमधून आमदार असण्यासोबतच त्या झारखंडच्या राज्यपाल आणि ओडिशाच्या परिवहन मंत्रीही होत्या.