अमेझॉन वर मल्याळम, तेलुगू आणि बंगाली भाषांमध्ये व्यवसायाची संधी

सणासुदीच्या आधीच मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॕमेझॉनने आपल्या विक्रेत्यांना भेट दिलीय. विक्रेते आता Amazon.in मार्केटप्लेसवर मल्याळम, तेलुगू आणि बंगाली या तीन भाषांमध्ये त्यांचा ऑनलाईन व्यवसाय नोंदणी आणि व्यवस्थापित करू शकतील, अशी माहिती कंपनीने दिली.

अॕमेझॉनने एका निवेदनात म्हटले आहे की, आगामी सणासुदीचा काळ डोळ्यांसमोर ठेवून हे पाऊल उचलण्यात आलेय, ज्यामुळे विद्यमान विक्रेते, अनेक संभाव्य आणि नवीन विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी विविध स्तरांतील बाजारपेठेतून फायदा होणार आहे. तसेच ते त्यांच्या आवडीच्या भाषेत काम करू शकतील.

या ऑफरसह Amazon.in आता विक्रेत्यांना बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, मल्याळम, तेलुगू, तमीळ आणि इंग्रजीसह आठ भाषांमध्ये त्यांचा ऑनलाईन व्यवसाय व्यवस्थापित करण्याचा पर्याय देते.

कंपनीने म्हटले आहे की, कोणत्याही प्रादेशिक भाषेचा वापर करून विक्रेते अॕमेझॉन विक्रेता म्हणून नोंदणी करण्यापासून ते प्रथमच ऑर्डर व्यवस्थापित करण्यापर्यंत सर्व काही करू शकतात. Amazon.in वर सध्या सुमारे 8.5 लाख विक्रेते आहेत.

Amazon Great Indian Festival : ‘या’ प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काऊंट
Amazon च्या वार्षिक ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची घोषणा करण्यात आली आहे. विक्रीच्या तारखा अद्याप उघड झालेल्या नाहीत. अधिकृत टीझर सुचवतो की, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान अॕमेझॉन स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टवॉच, ट्रू वायरलेस इअरबड्स आणि इतर सर्व इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या प्रमाणात सूट देणार आहे. मात्र डील्स अद्याप उघड झालेल्या नाहीत.

अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल 2021 च्या तारखांची अद्याप पुष्टी होणे बाकी आहे, परंतु या तारखा ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे. अॕमेझॉनने आगामी ग्रेट इंडियन सेल 2021 मध्ये सहभागी होणाऱ्या बँकांची पुष्टी केली आहे. एचडीएफसी बँकेने डेबिट आणि क्रेडिट कार्डसह अतिरिक्त 10 टक्के सूट देण्यासाठी Amazon सोबत भागीदारी केली आहे. जास्तीत जास्त बचत करण्यासाठी, Amazon पे ICICI बँक क्रेडिट कार्ड ऑफर आहे जी तुमच्या अमेझॉन पे बॅलेन्समध्ये 5% कॅशबॅक आणि 750 रुपये जॉइनिंग बोनस देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.