आज दि.२० सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

किरीट सोमय्या यांचा मोर्चा थेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे

अनिल परब, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वळवला आहे. काल गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत सोमय्या यांना विसर्जनात सहभागी होण्यापासून अडवण्यात आलं तर त्यांचा कोल्हापूर दौराही पोलिसांनी होऊ दिला नाही. त्यांना कराडमध्येच अडवण्यात आलं. यावेळी सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवरच प्रहार केले आहेत.

तुम्ही तक्रार दाखल करण्याचं काम
करा, तपास यंत्रणा कारवाई करतील

गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर निशाणा साधत असून गैरव्यवहाराचे आरोप करत आहेत. त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. घोटाळेबाज, तुरुंगात टाकेन अशी वाक्य, शब्द वापरण्याचा तुम्हाला अधिकार काय आहे? तुम्ही तुमचं तक्रार दाखल करण्याचं काम करा, तपास यंत्रणा कारवाई करतील अशा शब्दांत मुश्रीफ यांनी सोमय्यांना सुनावलं आहे.

रवींद्रनाथ टागोर यांच्या
लंडनमधील घराची होणार विक्री

लंडनमध्ये ज्या घरात रवींद्रनाथ टागोर राहत होते, ती इमारत आता विक्रीसाठी तयार आहे. भारताचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवणाऱ्या या इमारतीची किंमत २,६९९,५०० डॉलर म्हणजेच २७.३ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. १९१२ मध्ये रवींद्रनाथ टागोर काही महिन्यांसाठी उत्तर लंडनमधील हॅम्पस्टेड हीथ येथील “ब्लू प्लाक” इमारतीत राहिले होते. दरम्यान, २०१५ मध्ये लंडन दौऱ्यावर असताना ममता बॅनर्जी यांनी राज्य सरकारतर्फे रवींद्रनाथ टागोर यांचे निवासस्थान खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची
चरणजित चन्नी यांनी घेतली शपथ

चरणजित सिंग चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली. राजभवनात हा शपथग्रहण सोहळा सुरू आहे. चन्नी यांच्या व्यतिरिक्त पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काँग्रेस नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांना मंत्री पदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित आहेत. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी चन्नी यांना शपथ घेतल्यानंतर भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.

मधमाशांनी घेतला
63 दुर्मिळ पेग्विनचा बळी

मधमाशांच्या झुंडीने केप टाऊनच्या बाहेर समुद्रकिनाऱ्यावर ६३ दुर्मिळ आफ्रिकन पेंग्विनला मारून टाकल्याचं समोर आलंय. मारले गेलेल्या पेंग्विनची प्रजाती ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा प्रकारची घटना घडणं, दुर्दैवी आहे असं दक्षिण आफ्रिकेचे फाउंडेशन फॉर द कॉन्झर्व्हेशन ऑफ कोस्टल बर्ड्सने सांगितलं. “चाचणी केल्यानंतर, पेंग्विनच्या डोळ्यांभोवती मधमाशांचे दंश आढळले. अशाप्रकारे मधमाशानी तब्बल ६३ पेंग्विनला मारणं ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे पशुवैद्यकीय अधिकारी डेव्हिड रॉबर्ट्स यांनी दिली.

माजी मंत्री रजिंदरपाल सिंग भाटिया यांची आत्महत्या

भाजपाचे ज्येष्ठ नेते व खुज्जी विधानसभा मतदार संघाचे माजी मंत्री रजिंदरपाल सिंग भाटिया यांनी रविवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. राजिंदरपाल सिंग भाटिया खुज्जी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मिळालेल्या माहितीनुसार रजिंदरपाल सिंग भाटिया हे आपल्या लहान भावासोबत छुरिया भागात राहत

चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या
प्रकृती संदर्भात गुढ कायम

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. परदेशांमध्ये जिनपिंग यांच्या दौऱ्यांची कमी झालेली संख्या हे या चर्चेमागील मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या जिनपिंग हे प्रत्यक्षात कोणत्याही नेत्याला भेटण्याच्या स्थितीत नसल्याचा दावाही केला जात आहे. मात्र दाव्याबद्दल मतमतांतरे असल्याने जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गुढ कायम आहे.

काळ सर्व गोष्टींचा उलगडा
करेल : सोनू सूद

अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर चुकवला असल्याचा आरोप करत आयकर विभागाने सोनू सूदची चौकशी केली होती. यानंतर सोनू सूदने सोशल मीडियावर एक स्टेटमेंट जारी करत काळ सर्व गोष्टींचा उलगडा करेल असं म्हंटलं आहे. तो म्हणाला, “आपल्याला स्वत:ची बाजू मांडण्याची गरज नसते. काळ सर्व सांगतो. मी माझ्यापरीने आणि मनापासून प्रत्येक भारतीयाची सेवा करण्याची शपथ घेतली आहे. माझ्या फाउंडेशनमधील प्रत्येक रुपया अनमोल जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी आहे.

अटक वॉरंटचा इशारा देताच
कंगना न्यायालयात हजर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला मानहानी प्रकरणी पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट बजावण्यात येईल, असा इशारा अंधेरी न्यायालयाने दिला होता. यानंतर अखेर कंगना रणौत सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाली आहे. १४ सप्टेंबरला पार पडलेल्या सुनावणीत कंगनाला . करोनाची चाचणी करता यावी यासाठी तिला मंगळवारच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्याची विनंती कंगनाच्या वतीने न्यायालयाला करण्यात आली होती.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.