अखेर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. ३३ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच सुरत सोडले आहे. आपण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पडद्याआड असलेला भाजप आता समोर आला आहे.
एकनाथ शिंदे आपल्यासह ३३ आमदारांना घेऊन सुरतमध्ये दाखल झाले होते. पण सुरत हे मुंबईपासून जवळ असल्यामुळे मध्यरात्रीच गुवाहाटीला जाण्याचा प्लॅन रचला त्यानुसार मध्यरात्रीच सुरतमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांना एअरलिफ्ट केल्याचं समोर आलं आहे. काही तासांपूर्वीच सुरतच्या विमानतळावर तीन स्पाइसजेटच्या विमानाने गुवाहाटीला रवाना झाले आहे. आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी त्यांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीमध्ये एआरलिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती.
सुरतच्या ली मॅरेडियन हॉटेलमध्ये काही वेळापूर्वी तीन बसेस दाखल झाल्या होत्या. यातूनच आमदारांना एअरपोर्टपर्यंत नेण्यात आलं. बंडखोर आमदारांची पळवापळवी होऊ नये यासाठी त्यांना हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आमदारांचे नातेवाईकही त्यांना भेटायला येऊ शकतात. यासाठी सर्व बंडखोर आमदारांना हलवण्यात येणार आहे. सुरत एअरपोर्टवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.