विधान परिषद निवडणुकीचा निकाल म्हणजे महाविकास आघाडी सरकारसाठी मोठी धोक्याची घंटा आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून विजयाची हमी दिली जात होती. मात्र प्रत्यक्षात आघाडी सरकारला त्यांचं सरकार असूनही आपली मतं टिकवून ठेवता आलेली नाही, असंच काहीचं चित्र आहे. आघाडी सरकारची एक वा दोन नाही तर तब्बल 21 मतं फुटल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना त्यांच्याच आमदारांची डच्चू दिल्याचं सांगितलं जात आहे. परिणामी आघाडी सरकारमधील अनेक आमदार नाराज असल्याचं दिसून येत आहे.
भाजपला तब्बल 133 मतं मिळाली असून काँग्रेसला अवघी 42 मतं मिळाली आहे. काँग्रेसकडे एकूण 44 उमेदवार होते. पण, त्यांचे 2 उमेदवार फुटले आहे. 44 पैकी 42 मतं काँग्रेसला मिळाली आहेत. शिवसेनेला पहिल्या पसंतीची 51 मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादीला पहिल्या पसंतीची 57 मतं मिळाली आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस विधान परिषद निवडणुकीची तयारी करीत होते. यासाठी त्यांनी अनेक आमदारांच्या भेटी गाठी घेतल्या होत्या. यासाठी फडणवीसांनी आखलेला प्लान यशस्वी ठरला. त्यांनी या निवडणुकीत पाच उमेदवारांना उतरवलं होतं, आणि पाचही निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला होता. देवेंद्र फडणवीस यांचा प्लान यशस्वी ठऱला असून भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रविण दरेकर, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे पाचही उमेदवार विजयी झाले. देवेंद्र फडणवीसांना आपलं गणित जुळवत आमदारांची मत खेचून आणली आहेत. त्यामुळे त्यांनी डाव साधला असून आघाडी सरकार मात्र पुन्हा एकदा तोंडघशी पडली आहे.
तर मविआकडून सहा उमेदवारांना उतरवण्यात आलं होतं. यात राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमशा पाडवी, शिवसेनेचे सचिन अहिर हे चारही उमेदवार विजयी झाले. त्यात दहाव्या जागेसाठी चुरस सुरू झाली ती चक्क काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये. ही बाब आघाडी सरकारला धक्का देणारी आहे. त्यात काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंना हरवत भाई जगताप विजयी झाले आहेत.
कोणत्या आमदाराला किती मतं?
भाजपचे उमेदवार –
राम शिंदे–30
श्रीकांत भारतीय–30
प्रवीण दरेकर–29
उमा खापरे–27
प्रसाद लाड़– 17
शिवसेना
१. सचिन अहिर – 26
२. आमशा पाडवी – 26
राष्ट्रवादी काँग्रेस – (राष्ट्रवादीला हक्काच्या मतांपेक्षा 6 मतं अधिक)
१. रामराजे नाईक निंबाळकर – 28
२. एकनाथ खडसे – 29
काँग्रेस
१. चंद्रकांत हंडोरे – 22
2. भाई जगताप – 19