राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी भाजपचे पाचही उमेदवार विजयी होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आपल्या रणनीतीनुसार त्यांनी मताचं समीकरण जुळवून आणलं आणि तब्बल 134 मतांनी भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले.
निकाल समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या बड्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी फडणवीस माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा आघाडी सरकारमधील असंतोष दाखवून देत आहे. भाजपने म्हटल्याप्रमाणे पाच ही उमेदवार चांगल्या मतांनी विजयी झाले. महाराष्ट्रासाठी ही परिवर्तनाची नांदी आहे असंही ते यावेळी म्हणाले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस भाषणात
राज्यसभेत 123 आणि आता विधान परिषदेत त्याहून अधिक 134 मतांनी विजयी.
- आघाडी सरकारमध्ये असंतोष आहे. हा असंतोष असाच वाढत राहिला तर काय होईल हे आजच्या निकालाने दाखवलं आहे.
- ज्या अपक्षांनी आम्हाला मदत केली त्यांचे आभार..
- मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे आजारी असतानाही मतदानासाठी आले त्यामुळे त्यांचं खूप कौतुक आणि आभार.
- आमचा हा संघर्ष सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी आहे.
- लोकाभिमूख सरकार आणल्यानंतर आमचा संघर्ष थांबेल.