टी20 विश्वचषकाच्या स्पर्धेत पाकिस्तानचा सलग तिसरा विजय

पाकिस्तान क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकाच्या स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला आहे. आधी भारत मग न्यूझीलंड अशा बलाढ्य संघाना मात दिल्यानंतर आता अफगाणिस्तान संघालाही 5 विकेट्सने नमवत गुणतालिकेतील पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात पार पडलेल्या पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (Pakistan vs Afghanistan) सामन्यात पाकने आधी गोलंदाजी करत न्यूझीलंडला 147 धावांवर रोखलं. त्यानंतर 148 धावांचं लक्ष्य पाकने 5 विकेट्सच्या बदल्यात 19 षटकातचं पूर्ण केलं.

सामन्यात नाणेफेक जिंकत पाकने अफगाणिस्तानने फलंदाजीचा थोडा वेगळा निर्णय घेतला. वेगळा यासाठी कारण यंदाच्या विश्वचषकात प्रत्येक संघ नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत आहे. पण अफगाणिस्तानने फलंदाजीचा निर्णय़ घेतला. पण तो खास चांगाल ठरला नाही. संपूर्ण संघ मिळून केवळ 147 धावाच करु शकला. त्यातही वरची फळी संपूर्णपणे फेल गेली असताना कर्णधार मोहम्मद नबी आणि गुलाबदीन यांनी प्रत्येकी नाबाद 35 धावा करत संघाला किमान 147 धावापर्यंत पोहोचवलं. यावेळी इमाद वसिमने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर शाहीन, रौफ, हसन अली आणि शादाब खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

बाबरचं अर्धशतक अन् असिफने फिनीश केला सामना
148 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजमने उत्कृष्ट अर्धशतक झळकावत 51 धावा केल्या. त्याला सोबत देत फखर जमानने 30 धावांची खेळी केली. पण संघाला खरी गरज असताना अखेरच्या काही षटकात असीफ अलीने 7 चेंडूत 4 षटकार ठोकत नाबाद 25 धावा केल्या. ज्याच्या जोरावर सामन्यातही त्याने 1 ओव्हर आणि 5 गडी राखून पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.