सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी

सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर Carotid Artery revascularisation शस्त्रक्रिया पार पडली, जी मेंदूला रक्तपुरवठा पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया आहे. “प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि त्यांची प्रकृती बरी होत आहे. त्यांना काही दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, असे रुग्णालयाने सांगितले आहे.

रजनीकांत यांना चक्कर आल्याने, काल 28 ऑक्टोबरला संधेयाकाळी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे ‘रुटिन चेकअप’ (health check up) साठी रुग्णालयात नेण्यात आलं अशी माहिती देण्यात आली होती.

अभिनेता रजनीकांत दाखल असलेल्या रुग्णालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. सुमारे 30 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आशी माहिती मिळतेय. हा पोलीस बंदोबस्त रजनीकांतच्या चाहत्यांनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश करण्यापासून किंवा गर्दी रोखण्यासाठी आहे. तैनात करण्यात आलेल्या पोलीसांमध्ये तामिळनाडूचे विशेष पोलिसांच्या दोन तुकड्यांचा समावेश असून प्रत्येकी तुकडीत 10 जण आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, परिस्थिती नियंत्रणात राहण्यासीठी हा पोलीस बंदोबस्त रुग्णालयाच्या समोर तैनात करण्यात आलाय.

तामिळनाडू राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते राजकारणात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती. मागील वर्षी 31 डिसेंबरला त्यांनी नवा पक्षाची घोषणा करेल असं सांगितलं होतं. मात्र त्याआधी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांनी कोणताही पक्ष स्थापन करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये असतांना, 25 डिसेंबर 2020 रोजी अचानक त्यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 27 डिसेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.