पंढरपूर : वारकऱ्यांच्या भक्तीने पंढरी सजली, आषाढीसाठी ८ ते ९ लाख भाविक
एकीकडे हरीनाम आणि विठ्ठल भक्तीने पंढरी सजली आहे. सर्व संतांच्या पालख्या पंढरीत विसावल्या आहेत. टाळ मृदंग, भजन, कीर्तन आणि भाविकांची गर्दी दिसून येत आहे. यंदा सुरवातीला उन्हाचा तडाका त्याच वेळी लांबलेला पाऊस यामुळे भाविकांची संख्या कमी दिसून आली. यंदा दशमीला सायंकाळपर्यंत जवळपास ८ ते ९ लाख भाविक दाखल झाले आहेत. बुधवारी दुपारी विठ्ठलाची दर्शन रांग पत्रा शेड १० च्या पुढे गेली होती. शेवटच्या भाविकाला दर्शन घेण्यासाठी साधारणपणे १४ ते १५ तास लागत असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
पावलो पंढरी पार नाही सुखा … भेटला हा सखा मायबाप …. या अभंगाप्रमाणे भाविकांची विठ्ठल दर्शनाची तृष्णा पूर्ण झाली. यंदा पावसाने ओढ काढल्याने यात्रेवर परिणाम होईल असे वाटत होते. मात्र राज्यात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे पेरणीची कामे सुरू झाली आहे. परिणामी प्रशासनाने जो अंदाज व्यक्त केला. त्यापेक्षा कमी भाविक दाखल झालेत. असे असले तरी येथील मठ, धर्मशाळ, लॉज, मोकळे पटांगण जिथे जागा मिळेल तिथे भाविकांच्या राहुट्या, तंबू, पहावयास मिळत आहे. तसेच शहरातील मंदिर परिसर, प्रमुख रस्त्यावर भाविकांची वरदळ आहे. सर्वत्र भजन, कीर्तन, हरिनामाच्या गजराने नगरी दुमदुमून निघाली आहे.
महाविकासआघाडीमध्ये नवा ट्विस्ट, उद्धव ठाकरेंची आक्रमक रणनिती, काँग्रेस-एनसीपीचं टेन्शन वाढवणार?
लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे सर्वच पक्षांचं बैठकांचं सत्र सुरू आहे. महाविकासआघाडीने सुद्धा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.उद्धव ठाकरेंकडच्या बंड केलेल्या खासदारांच्या काही जागा आम्हाला द्या, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीने केली आहे. दुसरीकडे ठाकरेंनी मात्र आम्हाला 19 जागांवर निवडणूक लढवायची असल्याचं ठणकावलं आहे. त्यामुळे जागावाटपावरून महाविकासआघाडीमध्ये नाराजीनाट्य रंगणार हे आता स्पष्ट झालं आहे.
डोंबिवलीमध्ये ‘कोसळधार’, पोलीस स्टेशनच गेलं पाण्याखाली, गुडघ्याभर पाण्यात बसले कर्मचारी
डोंबिवली मध्ये बुधवार (28 जून) सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे अनेक भागांत पाऊस झाल्याने शहरांत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. मोठे नाले आणि गटारे यांची पूर्णत: साफसफाई न झाल्यानं काही भागात चाळीत पाणी शिरले आहे. यामध्ये मानपाडा पोलीस स्टेशनही सुटलेले नाही. डोंबिवली मधील मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये सर्वत्र पाणी शिरल्याचे पाहिला मिळाले.मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना गुडघाभर पाण्यात बसून राहावे लागले. पोलीस ठाण्याच्या मागेच एमआयडीसीचा एक मोठा नाला आहे. या नाल्यामध्ये सांडपाणी वाहत असते. मात्र, या नाल्याची व्यवस्थित साफसफाई केली जात नसल्याने नाल्यातील पाणी थेट पोलिस ठाण्यात शिरते असल्याचे सांगण्यात येत आहे.
बाळाला उकळत्या दुधाची अंघोळ; तडफडत होता चिमुकला, सर्व पाहत राहिले तमाशा
बाळांना दुधाने अंघोळ घातल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण सध्या असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात बाळाला उकळत्या दुधाने अंघोळ घातली जात आहे. बाळ तडफडत होतं, मोठमोठ्याने रडत होतं. पण कुणालाही पाझर फुटला नाही. सर्वांच्या समोर बाळावर उकळतं दूध टाकण्यात आलं पण तरी सर्वजण तिथं उभं राहून तमाशा पाहत राहिले. उत्तर प्रदेशमधील ही धक्कादायक घटना आहे.धार्मिक प्रथा, परंपरेच्या नावाने लोक काय काय नाही करत. अशीच ही यूपीतील घटना, ज्यात बाळाला उकळत्या दुधाने अंघोळ घालण्यात आली आहे. बलिया जिल्ह्यातील श्रवणपूर गावातील ही भयंकर घटना असल्याचं सांगितंल जातं आहे. एका साधूने चिमुकल्या जीवाला दुधाने अंघोळ घातली आहे.
राज्यात १,००० लोकांमागे केवळ ०.९ डॉक्टर, संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक काही वेळापूर्वी पार पडली. राज्यातील नागरिकांचं या बैठकीकडे लक्ष लागलं होतं. या कॅबिनेट बैठकीत कोणते निर्णय घेतले जाणार, शेतकऱ्यांसाठी काही ठोस पावलं उचलली जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्याप्रमाणे या कॅबिनेट बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यापूर्वी वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव देण्यात यावं आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला भारताचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात यावं अशा दोन मागण्या केल्या होत्या. या दोन्ही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
‘आषाढी’च्या दिवशी राज्यात ऑरेंज अलर्ट, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन उशीरा झालं असलं तरी आता पावसाने चांगलाच जोर धरला आहे. भारतीय हवामान खात्याने उद्या म्हणजेच 29 जूनला ऑरेंज अलर्ट दिला आहे, त्यामुळे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
शुक्रवारी रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे, त्यामुळे या भागात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. दुसरीकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महेश मांजेरकरांनी चक्क मुलाच्या हॉटलेमध्ये स्व:ताच्या हाताने बनवलं जेवण
सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. सध्या ते त्यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. महेश मांजरेकर सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्या कारणामुळं चर्चेत आले आहेत. त्याला कारणही तसंच आहे. त्यांचा एक व्हि़डिओ समोर आला आहे, यामध्ये महेश मांजेरकर लेकाच्या हॉटेलमध्ये चक्क जेवण बनवताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने हॉटेल व्यवसायाची सुरुवात केली आहे. सत्या मांजरेकरच्या या हॉटेलचे अनेकजण कौतुक करताना दिसत आहे. आता अभिनेता आकाश ठोसरने सत्य मांजरेकरांच्या हॉटेलमधील एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत स्वत: महेश मांजरेकर जेवण बनवताना दिसत आहेत.
SD Social Media
9850603590