आषाढी एकादशी निमित्त अंबाबाई देवीचं विठ्ठल रुक्मिणी रूप
आज महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जात आहे.आषाढी एकादशी निमित्त अंबाबाई देवीची विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. या पूजेमुळे अंबाबाईचं रूप अधिकच खुलुन दिसत होतं. भाविकांनी आज देवीच्या या अनोख्या रूपांचे दर्शन झाले.या एकादशीला अत्यंत महत्व आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटले जाते.यंदा आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूर येथे गेल्या आहेत.आषाढी एकादशी निमित्त सर्व स्थानिक मंदिरांमध्येही विठ्ठल रुक्मिणी रुपात पूजा बांधली जाते.
विठ्ठलाचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी
राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेले आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेऊन दिल्लीला रवाना झाले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा दिल्लीला जात असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संयुक्तपणे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. येणाऱ्या काळात लवकरच राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे.
शरद पवारांनी घेतली फडणवीसांची ‘विकेट’
पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा मागील 24 तासात पुन्हा गाजायला लागला आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी पहाटे शपथ घेतली होती, त्यावरून सुरू झालेलं राजकारण नॉन स्टॉप सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांनी ऐनवेळी भूमिका बदलली, असं वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्यानंतर खुद्द शरद पवारांनीच गुगली टाकली. ‘भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जावू शकतो, हे दाखवून द्यायचं होतं’ अशी गुगली टाकून शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीची विकेटच घेतली.राज्यात गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गौप्यस्फोट केला. पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवारांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी हे गौप्यस्फोट केले आहे. तर, फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी फडणवीसांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राष्ट्रवादीवर ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी यांचे आणखी घोटाळे बाहेर काढावेत, असं आवाहन केलं. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. ते गुरुवारी (२९ जून) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.शरद पवार म्हणाले, “मोदींनी शिखर बँकेबाबत आरोप केले. मात्र, शिखर बँक तर सोडाच, पण मी कुठल्याही सहकारी बँकेचा सदस्य नाही. या सहकारी बँकांकडून मी कधी कर्जही घेतलेलं नाही. शिखर बँकेबाबत मागे एकदा तक्रार झाली होती. चौकशीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि भाजपाच्या काही लोकांची नावं आली.”
रहाणेला उपकर्णधार बनवण्याच्या निर्णयावर गांगुलीचा संताप
भारताला १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या सायकलमध्ये खेळणार आहे. त्याचवेळी १८ महिन्यांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. रहाणेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चमकदार कामगिरीचे बक्षीस मिळाले. मात्र, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याने निवडकर्त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि निवड प्रक्रियेत स्थिरता आणि सातत्य ठेवण्याचे आवाहन केले.
स्टीव्ह स्मिथचे झंझावती शतक! ऑसी बॅट्समनच्या तुफानी खेळीने द्रविडसह सचिन-लाराचाही विक्रम मोडला
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने अॅशेसच्या दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले आहे. लॉर्ड्सवर इंग्लंड विरुद्ध सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्हने शतक झळकावले. पहिल्या दिवशी तो ८५ धावांवर खेळत होता. ३४ वर्षीय स्मिथचे हे कसोटीतील ३२वे शतक आहे. स्मिथने १६९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपले शतक पूर्ण करताना १४ चौकार मारले. त्याच्या तुफानी खेळीमुळे सचिन, लारा यांसारख्या अनेक दिग्गजांचे विकम मोडले गेले.इंग्लंडविरुद्ध स्टीव्ह स्मिथची बॅट जबरदस्त बोलते. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघाविरुद्धचे हे त्याचे १२वे शतक आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध ३५ कसोटी सामन्यांमध्ये १२ अर्धशतकेही केली आहेत. एजबॅस्टन येथे झालेल्या अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात स्मिथची बॅट शांत होती. पहिल्या डावात १६ धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात त्याला केवळ ६ धावाच करता आल्या. मात्र या सामन्यात त्याने सर्व मागचे हिशोब पूर्ण केले. जेव्हा तो खेळपट्टीवर फलंदाजीसाठी आला तेव्हा गोलंदाजांना खूप मदत होती, चेंडू स्विंग होत होता. त्याने १०२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
मध्य प्रदेशमधील विद्यार्थ्यांना सावरकरांवरील धडा!
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येताच स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी असलेला धडा अभ्यासक्रमातून वगळण्यात आला होता. यावरू देशभर वाद झाला. भाजपाने काँग्रेसवर टीकास्त्र डागलं. आता मध्य प्रदेश सरकारने शालेय अभ्यासक्रम अद्यायवत करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार, त्यांनी नव्या अभ्यासक्रमात सावरकरांचा धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यमंत्री इंदर सिंग परमार यांनी याबाबत माहिती दिली.“हिंदुत्त्वाचे विचारवंत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आता नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत अभ्यासाचा भाग असतील”, असं इंदर सिंग परमार यांनी सांगितलं. परंतु, विरोधी पक्ष काँग्रेसने याला राजकीय खेळी म्हणून संबोधले आहे.
१२ वर्षांनी संयुक्त राष्ट्रांच्या ‘या’ अहवालातून भारताची मुक्ती
सशस्त्र गटांद्वारे मुलांची भरती करणे, त्यांचा वापर करणे, मारहाण करणे, अपंग करणे आणि सशस्त्र संघर्षाच्या नोंदी असलेल्या Children and Armed Conflict या अहवालातील यादीतून भारताचं नाव आता काढण्यात आलं आहे. २०१० नंतरची ही पहिलीच वेळ आहे. बुर्किना फासो, कॅमेरून, लेक चाड बेसिन, नायजेरिया, पाकिस्तान आणि फिलिपाइन्स या देशांसह भारताचंही नाव या यादीत होतं. परंतु, आता भारताचं नाव कमी करण्यात आल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दिली. यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या ‘मुले आणि सशस्त्र संघर्ष’ या अहवालात म्हटले आहे की, “मुलांचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने केलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर भारताला २०२३ मध्ये अहवालातून काढून टाकण्यात आले आहे.”
केंद्राच्या ‘या’ योजनेसाठी गुजरातच्या मंदिरांनी ठेवलं २०० किलो सोनं; एकट्या अंबाजी मंदिराकडून आलं १६८ किलो!
भारत हा सर्वाधिक सोन्याची खरेदी करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मात्र, सामान्यपणे भारतात सोन्याची खरेदी दागिन्यांबरोबरच भविष्याची तरतूद म्हणूनही केली जाते. त्यामुळे अडचणीच्या काळासाठी खरेदी केलेलं किंवा राखून ठेवलेलं सोनं शक्यतो बाहेर न काढण्याच्या दिशेने सामान्य नागरिकांचा कल दिसून येतो. मात्र, एकीकडे हजारो किलो सोनं घराघरांत, कंपन्यांकडे, मंदिर ट्रस्टकडे पडून असताना दुसरीकडे भारताला परदेशातून सोनं आयात करण्याची वेळ येत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेमध्ये गुजरातमधल्या मंदिरांनी मिळून जवळपास २०० किलो सोनं ठेवलं आहे!देशभरात वेगवेगळ्या संस्था, कंपन्या, मंदिर ट्रस्ट आणि याचबरोबरीने घरोघरी मोठ्या प्रमाणावर सोनं पडून असताना त्याचा देशाच्या विकासासाठी अधिक उपयुक्त पद्धतीने वापर करता येऊ शकतो या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली. यानुसार या योजनेत ठेवलं जाणारं सोनं इतर उत्पादक गोष्टींमध्ये सरकारकडून गुंतवलं जातं. त्याबदल्यात सोनं ठेवणाऱ्यांना व्याजाच्या स्वरूपात परतावाही दिला जातो. त्यामुळे दोन्ही बाजूंचा फायदा होतो.
SD Social Media
9850 60 3590