मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
मोसमी वाऱ्यांनी रविवारी संपूर्ण राज्य व्यापले असून गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, मुंबईसह ठाणे, रायगड, कोकण, तसेच पालघर जिल्ह्यात दोन दिवसात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत मोसमी पावसाने हजेरी लावताच गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, मुंबईत मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.मुंबईबरोबरच, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि सातारा या भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण पट्ट्यातील रत्नागिरी, रायगड ते पालघरदरम्यान मंगळवारी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी कल्याण, ठाणे आणि नवी मुंबई या भागांमध्ये पावसाने हजेरी लावली.
“…त्यांच्यापेक्षा मोठे गद्दार महाराष्ट्रात कुणीही नाही”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल!
भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवारांनी १९७८ साली वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधून ४० आमदार फोडून भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं होतं. तेच लोक आता एकनाथ शिंदे यांना बेईमान म्हणत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते जळगाव येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात बोलत होते.देवेंद्र फडणवीस भाषणात म्हणाले, “मला कधी कधी आश्चर्य वाटतं की, काही लोक आमच्या सरकारला नावं ठेवतात. काल-परवा राष्ट्रवादीचे लोक म्हणाले की, आम्ही बेईमानीने सरकार स्थापन केलं. त्यामुळे मी त्यांना आठवण करून दिली की, १९७८ साली शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री होते. ते सरकारमधील ४० आमदार घेऊन बाहेर पडले आणि मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी बेईमानी केली, असं कुणीही म्हटलं नाही. त्यांनी तेव्हाच्या भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार स्थापन केलं होतं. त्यांना कुणीही बेईमान म्हटलं नाही. त्याला पवारसाहेबांची मुत्सद्देगिरी म्हटलं. मग आमच्या एकनाथ शिंदे यांनी तर भाजपाबरोबर निवडणूक लढवली होती.”
कर्नाटकची ‘अन्न भाग्य’ योजना अडचणीत
भारतीय अन्न महामंडळाने (FCI) राज्यांना अन्नधान्य वितरीत करू नये, असे आदेश केंद्र सरकारने याच महिन्यात महामंडळाला दिले. कर्नाटक सरकारने या निर्णयावर टीका केली असून हा राज्याच्या अन्न भाग्य योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने ‘फाइव्ह गॅरंटी’ या संज्ञेचा जाहीरनाम्यात वापर करून पाच आश्वासने दिली होती. ज्यामुळे सामान्य मतदारांकडून काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला. अन्न भाग्य योजनेनुसार दारिद्ररेषेखाली असलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिला पाच किलोचे अतिरिक्त अन्नधान्य मिळणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार दारिद्ररेषेखालील कुटुंबातील व्यक्तिला पाच किलो अन्नधान्य देण्याची तरतूद केली आहे. मात्र कर्नाटक सरकारने केंद्राच्या पुढे जाऊन आणखी पाच किलोचे आश्वासन दिले होते. अन्न भाग्य योजना १ जुलै पासून सुरू करण्याचा शब्द राज्य सरकारने दिला होता.
ऊस उत्पादकांसाठी आशादायी बातमी! सरकार देणार मोठं गिफ्ट
जूनअखेरीस सुरू झालेला पाऊस आणि सततच्या तापमानवाढीमुळे भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने तळ गाठत आहे. शेतात पाण्याअभावी ऊसाचे फड डोळ्यासमोर करपून जाताना पाहून बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच ऊस उत्पादकांसाठी एक आशादायी बातमी समोर आली आहे. निवडणुकांपूर्वी सरकार शेतकऱ्यांना खुश करण्याच्या तयारीत आहे. ऊसाच्या खरेदी दरात (एफआरपी) प्रति क्विंटल 10 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सध्या 305 रुपये प्रति क्विंटल असलेले ऊसाचे दर 315 रुपये प्रति क्विंटल करण्यात येतील. त्याचबरोबर ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या साखर हंगामात नवे दरही जारी केले जाऊ शकतात. याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
ज्योतिरादित्य सिंधिया यांना धक्का; एकामागून एक निकटवर्तीय नेत्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे निकटवर्तीय नेते आणि भाजपाचे शिवपुरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष राकेश कुमार गुप्ता यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी (दि. २६ जून) भव्य मिरवणूक काढून दोन हजार समर्थकांसह त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. २०२० साली ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत जे आमदार सरकारमधून फुटून बाहेर पडले होते. त्यापैकी गुप्ता एक नेते होते.
वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर होताच पाकिस्तानच्या पोकळ धमक्या सुरु
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक आणि ठिकाण बदलण्याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मागणी आयसीसीने फेटाळून लावली. मंगळवारी जाहीर झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम वेळापत्रकानुसार अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना निश्चित झाला आहे. त्याचवेळी, पाकिस्तानच्या अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांचे ठिकाण बदलण्याची पीसीबीची मागणी आयसीसीने फेटाळून लावली.एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक आणि ठिकाण बदलण्याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मागणी आयसीसीने फेटाळून लावली. मंगळवारी जाहीर झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम वेळापत्रकानुसार अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना निश्चित झाला आहे. त्याचवेळी, पाकिस्तानच्या अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांचे ठिकाण बदलण्याची पीसीबीची मागणी आयसीसीने फेटाळून लावली.
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रम मोडण्यावर मेस्सीचं मोठं वक्तव्य
लिओनेल मेस्सी किंवा ख्रिस्तियानो रोनाल्डो या महाद्वीपावर नसल्यामुळे युरोपियन फुटबॉल चाहत्यांची पुढील हंगामात निराशा होईल. २०२२च्या फिफा विश्वचषकानंतर रोनाल्डो सध्या अल नासेरसोबत सौदी अरेबियात आहे. लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो हे नक्कीच या पिढीतील सर्वोत्तम फुटबॉलपटू आहेत, जिथे त्यांचे रेकॉर्ड्स त्याच्या कर्तृत्वाबद्दल बोलतात. त्याच वेळी, दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील खूप जास्त आहे आणि त्यांची वारंवार एकमेकांशी तुलना केली जाते.दोन्ही खेळाडू करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत, तरीही प्रश्न विचारले जात आहेत. बार्सिलोनाच्या माजी खेळाडूला नुकतेच विचारण्यात आले की रोनाल्डोचा विक्रम मोडणे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे का? यावर बीआयएन स्पोर्टशी बोलताना तो म्हणाला, “नाही, थोडेसे.” मी आधी म्हटल्याप्रमाणे, माझ्या करिअरच्या या टप्प्यावर, मी आता यावर लक्ष केंद्रित करत नाही.”
SD Social Media
9850 60 3590