भारत सरकारने भारताच्या सर्व आंतरराष्ट्रीय हवाई सेवा पुन्हा सुरू करण्याची तारीख जाहीर केली आहे. विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले की 15 डिसेंबर 2021 पासून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सामान्य वेळापत्रकानुसार सुरू होतील. पण, काही देशांमध्ये नव्याने कोविडचा उद्रेक झाल्यामुळे, त्या देशांतील उड्डाणे पुन्हा सुरू होणार नाहीत. ज्या 14 देशांमध्ये अद्याप सामान्य आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार नाहीत त्यामध्ये युरोपियन देशांचा आणि न्यूझीलंडचा समावेश आहे.
ज्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे सामान्यपणे सुरू होणार नाहीत ते देश आहेत-ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, फिनलंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, सिंगापूर, बांगलादेश, बोत्सवाना आणि झिम्बाब्वे.
नवीन कोविड स्ट्रेन तसेच या देशांमधील वाढत्या संसर्गाचे प्रमाण लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने या 14 देशांना वगळे आहे.
मार्च 2020 पासून, कोविड महामारी सुरू झाल्यानंतर सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केली होती. 2020 च्या अखेरीपासून, वंदे भारत मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली आहेत, परंतु ती काही देशांपुरती मर्यादित आहेत. ज्या देशांसोबत भारताने करार केला आहे, त्या देशांमध्ये सध्या मर्यादित उड्डाणे सुरू आहेत. विमान कंपन्यांकडून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची मागणी होत होती कारण ते आर्थिक संकटात असल्याने त्यांनी सरकारला सांगितले होते. सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचीही प्रवाशांची मागणी होती कारण अजूनही अनेक लोक वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत.
कोवॅक्सिनला WHO ने मान्यता दिल्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू होतील अशी अपेक्षा होती. अनेक भारतीय ज्यांनी कोवॅक्सिन घेतले होते, ते आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकत नव्हते.