दक्षिण भारतात पावसाचा कहर सुरूच आहे. बहुतेक भागांमध्ये पूर आला आहे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून तामिळनाडू, पुडुचेरी, केरळसाठी विशेष पूर सूचना जारी करण्यात आली आहे. आणि रेड अलर्ट जारी केला आहे.
नोव्हेंबर महिन्यात दक्षिण भारताला अनेक वेळा मुसळधार पावसाचा सामना करावा लागला आहे. मात्र, यावेळी अनेक भागात पुराचा कहरही पाहायला मिळाला.
गेल्या आठवड्यात, पुरामुळे तिरुमला, तिरुपतीमध्ये शेकडो यात्रेकरू अडकले होते. पुरामुळे मूर्ती पाण्याखाली गेल्याने मंदिर परिसरात भीषण स्थिती होती. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. विमान आणि रेल्वे सेवा प्रभावित झाली. तिरुपतीचे रहिवासी सोशल मीडियावरलोकांना तिरुपतीचा प्रवास रद्द करण्याचे आवाहन करत होते.
नोव्हेंबर महिन्यात दक्षिण भारताला अनेक वेळा मुसळधार पावसाचा सामना करावा लागला आहे. मात्र, यावेळी अनेक भागात पुराचा कहरही पाहायला मिळाला. सक्रिय ईशान्य मान्सूनमुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये वारंवार पाऊस पडत आहे, असे IMD चे महासंचालक एम महापात्रा म्हणाले. या महिन्यात जवळजवळ प्रत्येक आठवड्यात बंगालच्या उपसागरावर सतत कमी दाबाचे क्षेत्र, चक्रीवादळ तयार होत आहे. 29 नोव्हेंबर रोजी अंदमान समुद्रावर आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार (IMD), 1 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान या दक्षिण भारतात 63 % अतिरिक्त पाऊस झाला आहे. तर, 1 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान पुर्ण भारतात 143.4% अधिक पावसाची नोंद झाली.