दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. सिनेसृष्टीत सर्वात मानाचा असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
सिनेसृष्टीतल महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जात. यंदाचा हा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. त्याचसोबत त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ” भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेता रजनीकांतजी यांना 2019 सालातील दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आंनद होत आहे. त्यांचं अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून असलेलं योगदान महत्वाचं आहे. ” असं ट्वीट करत प्रकाश जावडेकर यांनी ज्यूरी सदस्यांचे आभार मानले आहेत.