आंतरराष्ट्रीय योग दिन. यंदाची थीम आहे “मानवतेसाठी योग”. योग ही एक अशी शक्ती आहे ज्यामुळे आनंद, आरोग्य आणि शांती यांचा अनुभव घेता येतो. जीवनशैलीचे संपूर्ण सार योगाच्या विज्ञानात आत्मसात केले गेले आहे. अष्टांग योग म्हणजेच-यम,नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याचं पालन केलं तर अनेक फायदे मिळतात.मानवतेसाठी योग अशी थीम असलेला यंदाचा जागतिक योग दिन, योगाचे सार आपल्याला उमजायला मात्र हवे.योगाद्वारे वंध्यत्वावर कशी मात करु शकतो ,यावर टाकलेला प्रकाश….
आजकाल सर्वाची जीवनशैली बदलती झाली आहे. सततचे धावपळीचे जीवन, कामाचा ताणतणाव, आधुनिक उपकरणांचा प्रयोग, बैठेकाम, चुकीच्या आहार- विहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव इ. अनेक कारणांमुळे व्याधीचे प्रमाण वाढत आहे. यासोबत अनेक जोडप्यांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण देखील वाढत आहे.
वंध्यत्व म्हणजे अनुत्पादकता एखादे जोडपे संतती उत्पन्न करण्यास असमर्थ असणे म्हणजेच वंध्यत्व होय. वंध्यत्वास स्त्री किंवा पुरुष दोघींपैकी कुणीही जबाबदार असू शकतो.
वंध्यत्वाचे मुख्य प्रकार :-
प्रायमरी (प्राथमिक) :-
जेव्हा कुठलेही जोडपे, गर्भप्रतिबंधक उपाययोजना न करता, १ वर्षभर प्रयत्न करूनही गर्भधारणा ठेवण्यास असमर्थ असतात, तेव्हा त्यास प्राथमिक वंध्यत्व असे म्हणतात. अजूनपर्यंत कधीही गर्भधारणा झालेली नसते त्या प्रकारास प्रायमरी इनफर्टीलिटी असे म्हणतात.
सेकेंडरी –
ज्या जोडप्यांना यापूर्वी एकदा तरी गर्भधारणा झालेली आहे. परंतु दुसऱ्यांदा गर्भधारणा ठेवण्यास असमर्थ आहे. त्यांना सेकंडरी इनफर्टिलिटी असे म्हणतात.
वंध्यत्वाची कारणे :-
१) स्त्री वंध्यत्व :-
स्त्री प्रजनन संस्थेत असणारे रचनात्मक विकार जसे एंडोमेट्रोओसीस, युटेराईन, फायब्रॉईड, स्त्री बीज वाहिनी नलिका बंद असणे इ. तसेच किर्यात्मक विकृती ,म्हणजे स्त्रीबीज कोशात स्त्रीबीज तयार न होणे, किंवा तयार PCOS, थॉयरॉईड, हॉर्मोनल असंतुलन इ. अनेक कारणांमुळे स्त्री वंध्यत्व निर्माण होते.
२) पुरुष वंध्यत्व :-
पुरुष प्रजनन संस्थेत असणारे रचनात्मक विकृती, किंवा पुरुषबीज (चर्म) ची संख्या कमी असणे, स्पर्मची मोटीलिटी म्हणजेच हालचाल करण्याची क्षमता कमी असणे किंवा स्पर्मची विकृती रचना इ. कारणांमुळे पुरुष वंध्यत्व निर्माण होते.
वंध्यत्व उपाय योजना :-
वंध्यत्वास कारणीभूत असणाऱ्या घटकांचे सर्वप्रथम निदान करून त्यानुसार उपचार केले जातात. स्त्रियांमध्ये ovulation ला मदत करणारी औषधे Follicules फुत्न्यासाठीचे Injection इ. प्राथमिक उपाय केले जातात. पुरुषांमध्ये sperms ची संख्या, मोटिलिटी साठो औषधोपचार केले जातात. ART ( Assisted Reproductive Technology ) चा वापर केला जातो. यामध्ये IUI , IVT, ICSI इ. अॕडव्हान्स ट्रीटमेंट केले जातात. काही केसेसमध्ये सरोगसीचा आधार घेतला जातो.
या सर्व ट्रीटमेंट करतांना वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांमध्ये मानसिक ताणतणाव वाढीस लागतो.
योग व वंध्यत्व :-
योगासने व प्राणायाम यांच्या आधारे स्त्री व पुरुष दोन्ही पार्टनरची स्ट्रेस लेव्हल कमी होते. ताण-तणाव कमी होण्यास मदत होत असते.
हार्मोन्स असंतुलन दूर होऊन स्त्रियांमधील पाळीची अनियमितता, PCOS, PCOD , कष्टार्तव इ. अनेक समस्या दूर होतात.
विशिष्ट योगासनांच्या सरावामुळे प्रजनन संस्थेतील अवयवांकडे रक्तप्रवाह सुरळीत होतोत व त्यांची कार्यक्षमता वाढीस मदत होते.
योगासने :-
जसे उत्तानपादासन , मालासन , सर्वांगासन, बद्धकोनासन, जानुशिरासन, पश्चिमोत्तानसन, सेतुबंध सोबत प्राणायाम तसे दीर्घश्वसन, अनुलोमविलोम, भामरीप्राणायाम, मूलबंध, जालंधर बंध इ. अनेक प्रकारांमुळे शारीरिक, मानसिक स्वस्थ उत्तम होण्यास मदत होते.
संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे कि, योगाच्या सरावामुळे hypothalamic Pituitary gonadal axis यावर संतुलन येऊन संप्रेरके योग्य प्रमाणात स्रवतात. परिणामी ताणतणाव देखील कमी होते व QOL( Quality Of Life ) देखील सुधारण्यास मदत होते.
योगासनांच्या सरावांमुळे serum cortisol ची पातळी कमी होते व happy hormones चे प्रमाण वाढते.
नियमित योगासने, सूर्यनमस्कार इ. मुले वजन नियंत्रित राहते. अतिरिक्त मेद कमी होते, PCOS सारख्या विकारांवर नियंत्रण येते.
योगासनांच्या नियमित सरावामुळे प्राणायाम ध्यान, ओंकार साधना या सर्वांमुळे त्या जोडप्यांमध्ये सकारात्मक बदल घडून येतो, सकारात्मक विचार निर्माण होतात व ते ईप्सित लवकर साध्य करून आनंदी जीवन जगण्यास मदत होते.
डाॕ.सौ.शरयु जितेंद्र विसपुते
(B.A.M.S., M.A. Yog )
शतायु क्लिनिक व योग सेंटर, जळगाव
मो. नं.. ९४२०२६५६८०