महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोसळणारा पाऊस हा दोन दिवसांत उसंत घेईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली होती. विशेष म्हणजे पावसाचा दोन दिवसात वेग खरंच थोडासा मंदावल्याचं चित्र आहे. या दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी हवामान बदलाबद्दल एक महत्त्वाची माहिती दिली आहे. अरबी समुद्रात प्रचंड वेगाने वारे वाहणार आहेत. यांचा वेग तब्बल ताशी 45 ते 55 किमी असा असणार आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना होसाळीकर यांनी मासेमारीसाठी संबंधित कालावधीत जावू नये, असं आवाहन केलं आहे.
के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जुलैला ईशान्य अरबी समुद्रावर, महाराष्ट्र आणि कर्नाटक किनाऱ्यावर तसचे पूर्व अरबी समुद्रावर ताशी 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. विशेष म्हणजे 65 किमी Gusting असण्याची शक्यता आहे.
16 आणि 17 जुलैला उत्तर अरबी समुद्रावर जलद गतीने वारे वाहणार आहेत. तर 16 ते 20 जुलैदरम्यान गुजरातच्या किनार्यावर आणि पश्चिम मध्य नैऋत्य अरबी समुद्रावर 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या भागात मच्छिमारीसाठी जावू नये, असं आवाहन के एस होसाळीकर यांनी केलं आहे.