बॉलिवूडचं हॉट कपल आलिया भट आणि रणबीर कपूर अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. खास बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत वांद्र्यातल्या वास्तू बंगल्यात यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.
बॉलिवूडचं हॉट, सेन्सेशनल कपल अखेर लग्नाच्या बेडीत अडकलं आहे. रणबीरच्या वास्तू या बंगल्यामध्ये आलिया आणि रणबिरचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. नव्या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी नीतू, रिधिमा, करिना, करिष्मा, रणधीर, बबितासह सगळे कपूर्स आणि बॉलिवूडचे मोजके निमंत्रित पाहुणे उपस्थित होते. आलिया आणि रणबीरनं सब्यसाचीनं डिझाईन केलेले कपडे लग्नसोहळ्यात घातले होते.
मोतिया रंगाची शेरवानी, त्यावर मोत्याची माळ, आणि फेटा असा रणबीरचा पेहराव होता… तर एम्ब्रॉयडरी केलेली मोतिया रंगाची साडी, सोनेरी कुंदनचे सोनेरी दागिने, डोक्यावर ओढणी असा आलियाचा थाट होता. पारंपारिक पंजाबी पद्धतीनं सग्नसोहळा पार पडला. लग्नसोहळ्यात जोरदार फोटोसेशनही झालं.
दोघेही आज दोघेही लग्नबंधनात अडकले. आणि संध्याकाळी जोड्यानं माध्यमांसमोर आले. तिथेही या दोघांमधली चुलहुली केमिस्ट्री दिसली. रणबीरनं तर थेट आलियाला जेजुरी स्टाईल उचलूनही घेतलं. आणि मग मिस्टर अँड मिसेस कपूर सुखानं नांदण्यासाठी पुन्हा बंगल्यात गेले.