जवानांचं ऑपरेशन ऑलआऊट, लष्कर-ए-तैयबाच्या आणखी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांचे ऑपरेशन ऑलआऊट सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांसह लष्कराचे जवान अनेक भागात शोध मोहिमेदरम्यान सतत दहशतवाद्यांचा खात्मा करताना दिसतात. मंगळवारी रात्री उशिरा शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या जवानांना संयुक्त मोहिमेअंतर्गत शोपियानच्या कांजीउलर भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना मोठं यश मिळालं आहे. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम तीव्र केली.

काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, शोपियानच्या कांजीउलर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. याशिवाय ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लष्कर-ए-तैयबाशी संबंध

काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील कारवाई जम्मू-काश्मीर पोलीस करत आहेत. याआधी मंगळवारी श्रीनगरमधील बेमिना भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचंही सांगण्यात येत आहे.

सध्या आयजीपी काश्मीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव शोपियान येथील जान मोहम्मद असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच 2 जून रोजी कुलगाममध्ये एका बँक मॅनेजरच्या हत्येमध्ये जानचा हात असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.