पृथ्वीराज सम्राट या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस अपयशाने अक्षय कुमार हादरला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या हवाल्याने मीडियात आलेल्या बातम्यांनुसार, अक्षय भविष्यात कोणत्याही प्रकारचे प्रयोग करणार नाही. तसंच, तो पुन्हा एकदा अशा चित्रपटांकडे वळेल, ज्यामध्ये फक्त मसाला असेल. कंटेंट नाही.
द्विवेदी म्हणाले की, अक्षयने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला सांगितलं होतं की, जर पृथ्वीराज चौहानची बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी झाली नाही किंवा प्रेक्षकांना सिनेमा आवडला नाही. तर तो पुन्हा राऊडी राठोड आणि हाऊस फुल सारख्या चित्रपटांकडे वळेल. प्रयोग करण्याचा धोका पत्करणार नाही.
त्यांनी पुढे सांगितलं की, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही अक्षय म्हणत होता की मी प्रयत्न करतोय असे ऐतिहासिक किंवा कंटेंट चित्रपट करणे. पण हा ऐतिहासिक चित्रपट चालला नाही तर दुःख होईल. वैयक्तिकरित्या मला काही हरकत नाही कारण मी पुन्हा एकदा मसाला आणि अॕक्शन चित्रपट करायला सुरुवात करणार आहे. अक्षयचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे.
अलिकडच्या वर्षांत, अक्षयने त्याच्या खिलाडी कुमार किंवा मनोरंजनाच्या प्रतिमेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला अनेक चित्रपटांमध्ये यश मिळालं पण सम्राट पृथ्वीराज हा त्याचा महत्त्वाकांक्षी चित्रपट होता, जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप ठरला.