६ डिसेंबर १९४७ पंजाबमधील अमृतसरजवळील सरहाली गावी त्यांचा जन्म झाला.
प्रवीण कुमार सोबती यांना सुरुवातीपासूनच खेळाची आवड होती, त्यामुळे ते भारतीय खेळाडू बनले. प्रवीण कुमार सोबती हे ६० आणि ७० च्या दशकातील भारतातील प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक होते. हॅमर आणि डिसक्स थ्रोमध्ये त्यांनी दीर्घकाळ भारताचे प्रतिनिधित्व केले.
अॕथलीट म्हणून प्रवीण कुमार सोबती यांनी जगभरात अनेक पुरस्कार आणि पदके जिंकली होती. दीर्घकाळ अॕथलीट म्हणून भारताची सेवा केल्यानंतर प्रवीण कुमार सोबती यांनी अभिनयाकडे वळले.ते पहिल्यांदा अभिनेता जितेंद्र आणि अभिनेत्री परवीन बाबी यांच्या ‘रक्षा’ या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट १९८२ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. रक्षा या चित्रपटात प्रवीण कुमार सोबती एका छोट्या भूमिकेत दिसले होते. यानंतर त्याने हमसे है जमाना, युद्ध, लोहा, शहेनशाह, मिट्टी और सोना, आज का अर्जुन, जान आणि अजय यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. प्रवीण कुमार सोबती यांनी अमिताभ बच्चन अभिनीत शहेनशाह आणि धर्मेंद्रच्या लोहा, आज का अर्जुन, अजूबा आणि घायल यासह अनेक चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या. प्रवीण कुमार सोबती यांना त्यांच्या शरीरयष्टीमुळे बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका मिळाली. अनेक चित्रपटांमध्ये काम करूनही प्रवीण कुमार सोबती यांना खरी ओळख मिळाली ती प्रसिद्ध पौराणिक मालिका महाभारतातून. १९८८ मध्ये आलेल्या बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत त्यांनी भीमाची भूमिका साकारली होती, जी आजही प्रेक्षकांना खूप आवडते. याशिवाय प्रवीण कुमार सोबती यांनी चाचा चौधरी या मालिकेतूनही खूप नाव कमावले होते. या मालिकेत त्यांनी साबूची भूमिका साकारली होती, ज्याला खूप पसंती मिळाली होती.
काल त्यांचे दिल्लीत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.