आज दि.९ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

भीमा-कोरेगाव प्रकरणी
शरद पवार यांना नोटीस

भीमा-कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. त्याच्या चौकशीसाठी शरद पवार आपली साक्ष नोंदवणार आहेत. यासंदर्भात त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती.

भाजपा आमदार नितेश राणे
यांना सशर्त जामीन मंजूर

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे व त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी प्रत्येकी ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत नितेश राणे आणि राकेश परब या दोघांनाही कणकवली तालुक्यात येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे अॕड प्रदीप घरत, तर आमदार नितेश राणे, राकेश परब यांच्यासाठी अॕड. सतीश मानेशिंदे, अॕड. संग्राम देसाई, अॕड. राजेंद्र रावराणे आदींनी युक्तिवाद केला.

कर्नाटक सरकारचा हिजाबला
परवानगी देण्यास नकार

कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब परिधान केल्याचा वाद अद्याप मिटलेला नाही. या प्रकरणावर आज सलग दुसऱ्या दिवशी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी झाली, मात्र कोणताही निर्णय झाला नाही. न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या न्यायालयाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात यावे, असे या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाने सांगितले.

वाईन विक्रीविरोधात १४ फेब्रुवारीपासून
अण्णा हजारे यांचे उपोषण

राज्य सरकारने नुकताच सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअर्समध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला भाजपाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी येत्या १४ फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता अण्णांच्या या आंदोलनामुळे राज्य सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

२२४ धावांत भारताचे
आठ फलंदाज बाद

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज ९ फेब्रुवारी रोजी दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आजच्या सामन्यात कायरन पोलार्ड दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे निकोलस पूरन वेस्ट इंडीजचे नेतृत्व करत आहे. त्याने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात केएल राहुलचे पुनरागमन झाले असून इशान किशन संघाबाहेर आहे. २२४ धावांत भारताचे आठ फलंदाज बाद झाले. वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने आधी शार्दुल ठाकूर (८) आणि त्यानंतर मोहम्मद सिराजला (३) बाद केले.

राज्यातील शाळा शनिवार,
रविवार सुरू ठेवा : अजित पवार

राज्यातील सर्वच शिक्षकांनी शनिवार, रविवार शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमांतर्गत विजेत्या शाळांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

‘रायटिंग विथ फायर’ माहितीपटाची
अकॅडमी अवॉर्डस् साठी नॉमिनेशन

भारतातील ‘रायटिंग विथ फायर’ या माहितीपटाची 94 व्या अकॅडमी अवॉर्डस् साठी नॉमिनेशन मिळाले आहे. ही भारतासाठी (India) मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. द पावर ऑफ द गॉडला सगळ्यात जास्त कॅटेगॅरीमध्ये नॉमिनेशन मिळाले आहे. जगातील सगळ्यात प्रतिष्ठीत समजला जाणाऱ्या अकॅडमी अवॉर्ड म्हणजे सगळ्या चित्रपटकर्मींसाठी ती प्रतिष्ठेची बाब असते. या वर्षीही अनेक मोठे चित्रपट या पुरस्कार सोहळ्यात विजयाचे दावेदार होते. यावर्षी भारतीय प्रेषकांनी या पुरस्कार सोहळ्याकडून अपेक्षा आहेत, ऑस्कर पुरस्काराच्या यादीत भारतीय चित्रपटांनी जागा मिळवली आहे.

हिमस्खलनात सात
जवानांना वीरमरण

अरुणाचल भागात हिमस्खलनात सात जवानांना वीरमरण आले आहे. लष्कराने मंगळवारी याला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच हे सैनिक बर्फाखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात होती. यानंतर त्यांना वाचवण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र बचाव पथकाला जवानांचे मृतदेह आढळून आले आहेत. हिमस्खलनाची घटना राज्यातील कामेंग सेक्टरच्या उच्च उंचीच्या भागात घडली. परिसरातील खराब हवामानामुळे काम कठीण झाले. या संपूर्ण परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बर्फवृष्टी होत आहे.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.