फक्त चार कागदपत्रे द्या आणि गाई, शेळ्या, म्हैशी घेऊन जा; ठाकरे सरकारची पशुपालन योजना 

सध्या जनावरांच्या किंमतीत मोठी वाढल्या आहेत. बाजारात चांगल्या दूध देणाऱ्या संकरित गाई तसेच म्हशींच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेरील झालेल्या आहेत. त्याचबरोबर शेळ्या, मेंढ्या व कुक्कुट पालन यांच्याही किमती वाढलेल्या दिसत आहेत. अशा परिस्थितीत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना पशुसंवर्धन विभागातर्फे योजना राबविण्यात येणार आहेत. यामुळे त्यांचा स्वयंरोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतीपूरक व्यवसाय असल्याने आर्थिकदृष्टीनेही तो फायदेशीर ठरणार आहे.

अनुसूचित जाती, जमाती, नवबौद्ध प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील नागरिक, अत्यल्प, अल्प  भूधारक, सुशिक्षित बेरोजगार आणि या सर्व वर्गात मोडत असलेले महिला बचत गट यांना पशुधनासाठी अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी या योजनेअंतर्गत लोकांना अर्थसहाय्य दिले जात आहे. 

दोन दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप करण्यासाठीच्या योजनेअंतर्गत संकरित गाय- एच. एफ. किंवा जर्सी म्हैस –मुन्हा किंवा जाफराबादी देशी गाय-गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी प्रजातीच्या पशुधनासाठी अर्थसहाय्य करण्यात येते.

शेळी किंवा मेंढी गट वाटप करण्याच्या योजनेअंतर्गत अंशत: ठाणबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या किंवा मेंढ्या व १ बोकड किंवा नर मेंढा याप्रमाणे लाभाथींना वाटप करण्यात येते. एक हजार मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाच्या योजनेअंतर्गत पक्षी  खरेदी करण्यासाठी लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदान दिले जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान १८  वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले अत्यल्प किंवा अल्प भूधारक शेतकरी, रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेला सुशिक्षित बेरोजगार व महिला बचत गटातील योजनेसाठी पात्र आहेत.

लाभार्थ्यांची निवड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थ्यांची निवड करते. लाभार्थी निवडतांना ३० टक्के महिला आणि ३ टक्के अपंगांना प्राधान्य देण्यात येते. निवड झाल्यावर एका महिन्यात लाभार्थ्यांचा हिस्सा किंवा बँकेचे कर्ज उभारणे आवश्यक राहील. दुधाळ जनावरांची खरेदी तालुक्याचे पशुधन विस्तार अधिकारी करतील.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत  आधारकार्ड, मोबाईल नंबर, ७/१२ व ८-अ उतारे (अनिवार्य), शिधापत्रिकेची सत्यप्रत आणि सर्व सदस्यांचे आधारकार्ड क्रमांक आवश्यक,राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक सत्यपत्र, अर्जदाराचे छायाचित्र, अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र आणि दिव्यांग असल्यास दाखला जोडणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.