वाळूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी चक्क तहसिलदाराने महिना 30 हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात घडला आहे. तब्बल दीड लाखांची लाच घेताना तहसीलदाराच्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
निलंगा तालुक्यात वाळूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी तहसीलदाराने लाच मागितल्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तहसिलदार गणेश जाधव आणि एक एजंट रमेश मोगेरगे यांना अटक करण्यात आली आहे.
तहसीलदार गणेश जाधव याने आपल्या एजंटच्या मदतीने तक्रारदार दाराकडून वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालवू देण्यासाठी आणि वाळूच्या ट्रकवर या पुढे कारवाई न करण्यासाठी पैसे मागितले होते. यासाठी प्रती ट्रक 30,000/- रूपये प्रमाणे दोन ट्रकचे 60,000/- रूपये प्रति महिने असा व्यवहार ठरला होता. तीन महिन्याचे 1,80,000/- रूपये झाले होते. प्रत्यक्ष लाच मागणी करून तडजोडी अंती 1,50,000 रुपयांवर ठरलं होतं.