कार्यकर्त्यांसाठी त्यांचे नेते खूप काही असतात. त्यामुळे ते झपाटून काम करत असतात. वेळप्रसंगी अंगावर केसेसही घेतात. मात्र, कार्यकर्त्याला चक्क स्वत: नेताच मारत असेल तर. असाच बाका प्रसंग एका कार्यकर्त्यावर आला. आमदारांच्या पाया पडला आणि आमदारांनी कानाखाली आवाज काढला. त्यामुळे उपस्थित कार्यकर्ते चक्रावून गेलेत. याचीच शहरात जोरदार चर्चा होती.
-बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पाया पडायला आलेल्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. कार्यकर्ता आमदारांच्या पाया पडला आणि कानाखाली प्रसाद घेऊन गेला, अशी चर्चा दिवसभर होती.
सोलापुरातील बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता आमदारांनी एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लागवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बार्शीत एका क्रिकेटच्या सामन्याच्या कार्यक्रमावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाया पडण्यासाठी एक कार्यकर्ता आला होता तो आमदारांच्या चरणावर मस्तक ठेवून लिनही झाला. मात्र तो जसा पाया पडून वर उठला तशी आमदारांनी त्याच्या कानशिलात लगावली.
या कानशिलात लगवल्याचं कारण अद्याप तरी अस्पस्ट आहे. मात्र. आमदारसाहेबांच्या पाया पडून कानाखाली प्रसाद मिळालेल्या घटनेचा व्हिडिओ जिल्हाभरात चांगलाच वायरल होत आहे. तसेच एखाद्याने पाया पडल्यानंतर कोणताही व्यक्ती पाया पडणाराची चूक माफ करतो. मात्र बार्शीत नेमकं उलट घडलं, पाया पडला आणि कार्यकर्ता कानाखाली प्रसाद घेऊन गेला.