31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन; दरवर्षी स्वत:च्या हाताने मृत्यू ओढावतायत 80 लाख लोक

जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो. या विशेष दिवशी तंबाखूच्या धोक्यांबद्दल जगभरात जनजागृती केली जाते. तंबाखू खाणे शरीराला किती हानीकारक आहे, याची माहिती या विशेष दिवशी जगभरात देण्यात येत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार, दरवर्षी जगभरात सुमारे 80 लाख लोक तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांमुळे मृत्युमुखी पडतात. या कारणास्तव, या विशेष दिवशी जनतेला तंबाखू सेवनाचे धोके, तंबाखू कंपन्यांच्या व्यवसाय पद्धती, WHO योजना इत्यादींबद्दल माहिती दिली जाते.

इतिहास काय आहे

जागतिक तंबाखूजन्य संकट, साथीचे रोग आणि मृत्यूची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने 1987 मध्ये पहिला ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ साजरा केला. 1987 मध्ये, जागतिक आरोग्य सभेने WHA40.38 ठराव पारित केला, ज्यामध्ये 7 एप्रिल हा “जागतिक धूम्रपान निषेध दिवस” ​म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव होता. यानंतर 1988 मध्ये WHA42.19 हा ठराव पारित करण्यात आला, ज्यामध्ये 31 मे हा दिवस ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ म्हणून जारी करण्यात आला. तेव्हापासून या दिवशी जगभरातील लोकांमध्ये तंबाखूचे घातक परिणाम आणि त्याचे सेवन याबाबत जनजागृती केली जात आहे.

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे तंबाखूचे धोके आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबद्दल लोकांमध्ये जागृती करणे. एवढेच नाही तर निकोटीनच्या वापरामुळे आणि तंबाखूच्या सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यू कमी करणे, हा देखील उद्देश आहे.

यावेळची थीम काय

यावेळी ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ची थीम आहे- ‘पर्यावरणाचे रक्षण करा’. गेल्या वर्षी या दिवसाची थीम ‘कमिट टू क्विट’ होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.