देशात घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यानंतर देशात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीचा आकडा 1000 च्या पुढे गेला आहे.
एलपीजीच्या दरात पुन्हा वाढ वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 3 रुपये 50 पैशांनी वाढ झाली आहे. त्यानंतर देशात घरगुती एलपीजी सिलिंडरचा आकडा 1000 च्या पुढे गेला आहे. तर व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये 8 रुपयांची वाढ झाली आहे. ही याच महिन्यात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईचे चटके अधिक बसणार आहे. हॉटल्समधील खाणेही आता आणखी महागणार आहे.
आज घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 3 रुपये 50 पैशांनी वाढ झाली आहे. त्यानंतर देशात घरगुती एलपीजी सिलिंडरचा आकडा 1000 च्या पुढे गेला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आजपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्ली आणि मुंबईमध्ये 1003 रुपये, कोलकात्यात 1029 रुपये, चेन्नईमध्ये 1018.5 रुपये झाली आहे.
घरगुती एलपीजी व्यतिरिक्त, व्यावसायिक एलपीजी सिलिंडर देखील 8 रुपयांनी महाग झाला आहे. आजपासून 19 किलो वजनाचा सिलिंडर दिल्लीत 2354 रुपये, कोलकात्यात 2454 रुपये, मुंबईत 2306 रुपये आणि चेन्नईमध्ये 2507 रुपयांना मिळणार आहे. 7 मे रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडर 10 रुपयांनी स्वस्त झाला होता.