पावसाच्या आगमनाची बातमी. दोन ते तीन दिवसांत दक्षिण अरबी समुद्रात मान्सून पोहोचणार आहे. मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सूनसाठी हा काळ अनुकूल आहे. मात्र, विदर्भात 21 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
अंदमानच्या समुद्रानंतर सध्या बंगालच्या उपसागरात प्रगती करीत असलेला र्नैऋत्य मोसमी पाऊस पुढील दोन ते तीन दिवसांत दक्षिण अरबी समुद्रात पोहोचणार आहे. सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रातही काही भागात पावसाची शक्यता आहे.
यंदा नियोजित वेळेपेक्षा तब्बल सहा दिवस आधी म्हणजे 16 मे रोजी मोसमी वारे सक्रिय होऊन अंदमानात मोसमी पाऊस दाखल झाला. पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्रापर्यंत मजल मारतील अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. असे असलं तरी विदर्भातील अमरावती आणि अकोल्यात 21 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार आहे.