पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात एका महिला पोलिसाचे अतिशय घृणास्पद कृत्य उघडकीस आले आहे. त्यानंतर त्या महिला पोलिसावर कारवाई करीत तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. या पोलीस महिलेने एका महिला कैद्याला कपडे काढायला लावले, त्यानंतर तिला तुरुंगात डान्स करायला लावले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याची माहिती दिली आहे. आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी पोलीस चौकशी समितीने निरीक्षक शहाना इर्शाद यांना दोषी ठरवले आहे.
पोलीस चौकशीसाठी महिला कैदीला आणले होते
शबानाने पोलीस कोठडी दरम्यान कारागृहात बंद असलेल्या महिला कैद्यासोबत अमानवी कृत्य केल्याचे समितीने म्हटले आहे. क्वेट्टाचे उपमहानिरीक्षक मुहम्मद अझहर अक्रम म्हणाले, ‘तपासात असे आढळून आले की महिला निरीक्षकाने परी गुल नावाच्या महिलेला चौकशीसाठी आणले होते. हे प्रकरण क्वेट्टामधील जिना बस्ती भागात एका मुलाच्या हत्येशी संबंधित आहे. जेव्हा महिला (परी गुल) पोलीस कोठडीत होती, तेव्हा महिला निरीक्षक शबानाने तिला केवळ नग्न केलेच नाही तर इतर कैद्यांसमोर नाचण्यासही भाग पाडले.
न्यायालयाने पीडितेची कारागृहात रवानगी केली आहे. अक्रम म्हणाला, ‘लेडी इन्स्पेक्टरला तिच्या बचावात काही बोलायचे नव्हते. त्यामुळे तिला सेवेतून बळजबरीने निवृत्त करून बडतर्फ करण्यात आले आहे. महिला कैद्याची चौकशी करणे महिला निरीक्षकांना आम्ही बंधनकारक केले आहे, जेणेकरून तिला तुरुंगातही सुरक्षित ठेवता येईल.
पाकिस्तानमध्ये महिलांविरोधातील गुन्हे वेगाने वाढत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की आता त्या तुरुंगातही सुरक्षित नाही. अलीकडे, महिलांच्या हत्येशी संबंधित अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली, ज्यामध्ये महिलांनी सरकारकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली.