वाराणसीतल्या ज्ञानवापी मशिदीचा वाद चांगलाच पेटलाय. मशीद बांधण्याआधी याठिकाणी महादेवाचं मंदिर असल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केलाय. आता या दाव्याला पुष्टी देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. 30 सेकंदाचा हा व्हिडीओ या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरू शकतो.
या व्हिडीओत ज्ञानवापी मशिदीतल्या वझुखान्यात नंदी असल्याचं स्पष्ट दिसतंय. वझुखाना आणि नंदी यांच्यासमोर एक लोखंडी जाळी आहे. यापूर्वी याच वझुखान्यात शिवलिंग असल्याचा दावा करण्यात आला होता. आता नंदीचं तोंड वझुखान्याच्या दिशेनं असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 30 सेकंदाच्या या व्हिडिओनं ज्ञानवापी प्रकरणात मोठी खळबळ उडालीय.
ज्ञानवापी मशिदीतला वझुखाना प्रशासनानं सील केला आहे. इथं कुणालाही जाण्यास मनाई आहे. नंदीसमोर एक लोखंडी जाळी लावण्यात आलीय. या वझुखान्याच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफ जवानांवर सोपवण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टानं ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यावेळी इथं शिवलिंग आढळून आल्याचा दावा करण्यात आला. आता इथं नंदी असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानं ज्ञानवापी प्रकरण वेगळ्या वळणावर येऊन ठेपलंय.