WhatsApp ने मार्चमध्ये 18.05 लाख भारतीय खात्यांवर बंदी घातली. युजर्सकडून आलेल्या तक्रारी आणि या प्लॅटफॉर्मवरील सेवा शर्तींचे उल्लंघन रोखण्यासाठी अंतर्गत यंत्रणेचा भाग म्हणून कंपनीने ही कारवाई केली आहे. सोशल मीडिया कंपनीच्या मासिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी लागू झालेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान (IT) नियमांनुसार, 5 दशलक्षाहून अधिक युजर्स असलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मने दर महिन्याला अनुपालन अहवाल प्रकाशित करणे आवश्यक आहे. या अहवालांमध्ये तक्रारी आणि त्यावर केलेल्या कारवाईचा तपशील असतो.
ताज्या अहवालानुसार, 1 ते 31 मार्च 2022 दरम्यान, WhatsApp ने 18.05 लाख भारतीय खात्यांवर बंदी घातली आहे. +91 फोन नंबरद्वारे भारतीय खाती ओळखण्यात आली. व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, “ताज्या मासिक अहवालात नमूद केल्याप्रमाणे, कंपनीने मार्च महिन्यात 18 लाखांहून अधिक खाती बंद केली आहेत.”
कंपनीने सांगितले की, आमच्या प्लॅटफॉर्मवर आमच्या युजर्सची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षांपासून सातत्याने काही पाऊलं उचलली आहे. मेटा मालकीच्या व्हॉट्सअॅपने फेब्रुवारीमध्ये 14.26 लाख भारतीय खात्यांवर बंदी घातली होती.
अकाऊंटचा गैरवापर करणाऱ्य़ा किंवा युजर्सकडून नकारात्मक अभिप्राय येणाऱे अकाऊंटवर कारवाई केली जाते.