900 टन सोनं बाहेर काढले, KGF ची खरी कहाणी जाणून घ्या

KGF हा साऊथचा सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. हा सिनेमा येताच त्याने लोकांना वेड लावलं होतं, दक्षिण भारतीयच नाही तर, या सिनेमाचा जवळ-जवळ संपूर्ण देश वेडा झाला आहे. ज्यानंतर याचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित करण्याची प्रेक्षकांनी मेकर्सकडे मागणी केली, ज्यानंतर आता लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची कहाणी सोनं आणि त्याच्या खाणीशी संबंधीत आहे. तसेच ही स्टोरी सत्य घटनांवर आधारीत आहे. हा 100 वर्षांहून अधिक जुना इतिहास आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण या चित्रपटात जितकी भयानक परिस्थिती दाखवली आहे, त्याहून भयानक याची खरी कहाणी आहे.

‘KGF’ चे पूर्ण नाव कोलार गोल्ड फील्ड्स आहे, जे कर्नाटकच्या दक्षिण पूर्व भागात आहे. केजीएफमधील उत्खननाचा इतिहास 121 वर्षांचा आहे आणि येथून इतक्या वर्षात 900 टन सोनं बाहेर काढल्याचं सांगितलं जातं. एशियाटिक जर्नलमधील एका लेखात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

कोलारमध्ये सापडलेल्या सोन्याबद्दल लेखात चार पाने लिहिली होती. हा लेख ब्रिटिश सैनिक मायकेल फिट्झगेराल्ड लेव्हली यांनी 1871 मध्ये वाचला होता.

कोलार गोल्ड फील्डचा इतिहास काय?
ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ही जमीन म्हैसूर राज्याला दिली, परंतु त्यांनी कोलारच्या सोन्याच्या खाणीचे क्षेत्र त्यांच्याकडे ठेवले. इतिहासकारांच्या मते त्याकाळी चोल साम्राज्यातील लोक कोलारच्या भूमीत हात घालून तेथून सोने काढायचे. ब्रिटीश सरकारचे लेफ्टनंट जॉन वॉरन यांना हे कळताच त्यांनी गावकऱ्यांना बक्षीस देण्याचे आमिष दाखवून हे सोने काढले.

बक्षीसाची माहिती मिळताच गावकरी मातीने भरलेली बैलगाडी घेऊन वॉरेनला पोहोचले. ग्रामस्थांनी पाण्याने माती धुतली असता त्यात सोनं दिसू लागतं, वॉरनला विश्वास बसला नाही, तर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली.

यानंतर वॉरनला त्यातून 6 किलो सोनं मिळालं होतं. बर्‍याच वर्षांनंतर 1871 साली ब्रिटीश सैनिक मायकल फिट्झगेराल्ड लेवेलीने वॉरनचा लेख वाचला तेव्हा त्याच्या मनात सोने मिळवण्याची तळमळ जागृत झाली.

ज्यानंतर तो सोन्याच्या शोधात बंगळुरुमध्ये पोहोचला आणि कोलार खाणीत त्याने शोध घेतला, ज्यानंतर त्याने सुमारे दोन वर्षांनी म्हैसूरच्या महाराजांना पत्र लिहून कोलार उत्खननाचा परवाना मागितला.

लेवेलीने 20 वर्षांपासून कोलारमध्ये खोदकाम करण्याचा परवाना मागितला होता आणि त्यानंतर मृत्यूचा खेळ सुरू झाला. ब्रिटिशांनी KGF ला लिटल इंग्लंड म्हणायला सुरुवात केली होती. येथे सोन्याच्या खाणीत काम करण्यासाठी मजूर सातत्याने येत होते. 1930 सालापर्यंत KGF मध्ये सुमारे 30 हजार मजूर काम करत होते.

त्यानंतर स्वतंत्र भारताच्या काळात, भारत सरकारने KGF च्या खाणी ताब्यात घेतल्या आणि 1956 मध्ये या खाणीचेही राष्ट्रीयीकरण झाले आणि 1970 मध्ये भारत गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीने तेथे काम सुरू केले. सुरुवातीला या खाणींमधून सरकारला खूप फायदा झाला, पण 80 च्या दशकापर्यंत कंपनी तोट्यात गेली आणि कंपनीला आपल्या कामगारांच्या हक्कासाठी पैसे देण्याइतके उत्पन्नही नव्हते.

त्यानंतर 2001 मध्ये येथील उत्खनन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि कोलार गोल्ड फील्ड अवशेष बनले. केजीएफमध्ये अजूनही सोने असल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. परंतु भारत गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीच्या मते आता तेथे सोनं शिल्लक नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.