तिने फक्त इंटरनेटच्या मदतीने upsc परीक्षा केली उत्तीर्ण

युपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणं अनेकांचं लक्ष्य असतं. ही खडतर परीक्षा उत्तीर्ण होऊन सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न अनेकजण पाहत असतात. अनेकजणांकडून ऐकायला मिळतं की, या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी क्लास लावायलाच हवा. परंतू अनुकृती शर्माने हे धारणा खोडून काढली आहे. तिने कोणताही क्लास न लावता फक्त इंटरनेटच्या मदतीने परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

लग्नानंतर बहुतांश तरुणींचा संसारातील जबाबदाऱ्या सांभाळण्यात वेळ जातो. असं असतानाही अनुकृती शर्मा या तरुणीने प्रतिकुल परिस्थितीतही आयएएस होण्याचा निश्चय केला. आणि तयारी सुरू केली. तिचं म्हणणं आहे की, तुम्ही अभ्यासात सातत्य ठेवल्यास, तुम्हाला यश नक्की मिळेल. अनुकृतीसारखी अधिकारी त्या मुलींसाठीही प्रेरणादायी ठरतेय ज्या लग्नानंतरही युपीएससी परीक्षा देण्याचा विचार करीत असतात.

असा राहिला युपीएससी उत्तीर्ण करण्याचा प्रवास
अनुकृती शर्माने आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर तिने विज्ञानात विदेशात संशोधन केले.त्यानंतर भारतात येऊन युपीएससी नागरी सेवा परीक्षा दिली. युपीएससीमध्ये सलग 3 वेळा अपयश आलं. परंतू ती निराश झाली नाही. तिने आपला अभ्यास सुरू ठेवला. युपीएससी 2017च्या परीक्षेत तिला अखेर यश मिळाले. युपीएससी नागरी सेवेत तिला 355 वी रॅंक मिळाली. परंतू या रँकवर ती समाधानी नव्हती. 2019 मध्ये आणखी एक प्रयत्न केला यावेळी तिला 138 वी रँक मिळाली. आणि तिचे आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी अनुकृतीचा सल्ला
युपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अनुकृतीने सेल्फ स्टडीवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. ती म्हटली तुम्ही कोचिंग करीत असाल तर, चांगली गोष्ट आहे. परंतू सेल्फ स्टडीवर फोकस ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

अनेकदा तुम्हाला अपयश मिळू शकतं. परंतू निराश होण्याची गरज नाही. आज आपल्याकडे इंटरनेट सहज उपलब्ध आहे. इंटरनेटवर युपीएससी परीक्षेशी संबधित अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्यामाध्यमातून तुम्ही तयारी करू शकता. परंतू तुम्ही तुमचा अभ्यास अचूक निवडायला हवा. अन्यथा तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. अभ्यास करताना तुमची प्रगती वेळोवेळी तपासात राहा. जेणेकरून तुम्ही परीक्षा उत्तीर्ण करू शकाल.

upsc परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या बहिणी विषयी जाणून घ्या इथे :

https://upscgoal.com/2023-2/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.