रक्षाबंधन हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा हा सण असल्यामुळे या सणाला मोठे महत्त्व आहे.रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर सुंदर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
या सणाला प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी सर्वात सुंदर राखी निवडण्याचा प्रयत्न करत असते.भारताप्रमाणेच परदेशातही रक्षाबंधन हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो.यामिनित्तने गेल्या काही आठवड्यांपासून रंगीबेरंगी राख्यांनी बाजार फुलून गेला आहे.राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला प्रेमाणे मिठाई, चॉकलेट्स तसेच इतर भेटवस्तू देतो.रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर बाजारात वेगवेगळ्या मिठाया आल्या आहेत.
नाशिकमध्ये तर चक्क सोन्याचा मुलामा असलेली मिठाई दाखल झाली आहे.या मिठाईची किंमत प्रतिकिलो ६ हजार रुपये आहे.महाग असली तरी लोक या मिठाईला आवडीने खरेदी करत आहेत.