सैन्य मागे घेण्याचा चीनचा
प्रस्ताव भारताने फेटाळला
भारताने पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्ज येथील गस्ती पॉइंट १५ वरून फौजा परत घ्याव्यात हा चीनचा प्रस्ताव भारताने फेटाळून लावला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी गेल्या महिन्यात भारतात आले होते, त्याच सुमारास चीनने हा प्रस्ताव भारतापुढे ठेवला होता. ’पेट्रोलिंग पॉइंट १५’ (पीपी १५) वर गेल्या सुमारे दोन वर्षांपासून भारतीय फौजांच्या समोरासमोर असलेल्या भारतीय फौजा पीपी १६ व पीपी १७ दरम्यानच्या करमसिंग चौकीपर्यंत मागे न्याव्यात असा प्रस्ताव ठेवला होता.
जितेंद्र आव्हाड म्हणतात,
त्यांचा हेतू चांगला नव्हता
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. आव्हाडांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. “परवा साहेबांच्या (शरद पवार) घरी हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वच्छ नव्हता. शरद पवारांच्या घराची रेकी केली होती. त्यांना शरद पवारांना शारिरीक इजा करायची होती. महाराष्ट्राचं नशीब असं काही घडलं नाही”, असं आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मोहित कंबोज यांनी दिली
१० हजार भोंग्यांची ऑर्डर
मशिदीवरचे भोंगे हटवावेत अथवा त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात मंदिरांवर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावावी, अशा आशयाचं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी १० हजार भोंग्यांची ऑर्डर दिली आहे. मोहित कंबोज यांनी १० हजार भोंग्यांची ऑर्डर दिली असून त्यापैकी ५०० भोंगे कंबोज यांच्या मुंबईमधील खार इथल्या निवासस्थानी आले आहेत. याबद्दल बोलताना मोहित कंबोज म्हणाले की, आम्ही राज्यातल्या प्रत्येक मंदिरात, ज्यांना ज्यांना गरज आहे, त्यांना मोफत भोंगे देण्याचा संकल्प केला आहे. हे भोंगे राज्यभरामध्ये मोफत वितरीत करण्यात येणार आहेत.
आम्ही समोरासमोर लढणारे
मर्द : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या मी शुभेच्छा देतो. अशी सभा घेण्याची माझी सवय नाही, कारण आपण समोरा-समोर लढणारे मर्द आहोत. कोल्हापूर ही तर मर्दांची भूमी आहे. कालच कुस्तीपटू पृथ्वीराज याने महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवलेला आहे. पृथ्वीराजच्या रूपाने २१ वर्षानंतर कोल्हापूरला हा बहुमान मिळाला. पण लढायचं कसं आणि ते सुद्धा मर्दाने लढायचं कसं हे या कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे.
हाफिझ तल्हा सईद याला केले
केंद्र सरकारने दहशतवादी घोषित
लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख नेता आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद याचा मुलगा हाफिझ तल्हा सईद याला केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. हाफिझ तल्हा सईद (४६) याचा लष्कर-ए-तैयबातर्फे भरती, पैसा गोळा करणे, तसेच भारतात हल्ल्यांची योजना आखून ती अमलात आणणे यात सक्रिय सहभाग आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे. हाफिझने लष्कर-ए-तैयबाच्या पाकिस्तानातील विविध केंद्रांना भेटी दिल्या असून, आपल्या धार्मिक प्रवचनात तो भारत, इस्रायल, अमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांतील भारतीय हितसंबंधियांविरुद्ध जिहादचा प्रचार करत असतो, असेही मंत्रालयाने सांगितले आहे.
मोफत लसीकरणामुळे
एलपीजीच्या किमती वाढल्या
काँग्रेसच्या महिला विंगच्या कार्यवाहक प्रमुख नेट्टा डिसोझा या स्मृती इराणीची चौकशी करत होत्या. डिसूझा यांनी यासंदर्भात व्हिडीओ ट्विट केलाय. ज्यामध्ये मंत्री त्यांच्या फोनवर हे संभाषण रेकॉर्ड करताना दिसत आहेत. नेट्टा डिसोझा यांनी हा व्हिडीओ ट्वीट करताना स्मृती इराणींना टॅग केलंय. कॅप्शनमध्ये म्हटलंय की, “मोदीच्या मंत्री स्मृती इराणी यांची गुवाहाटीला जाताना भेट झाली. एलपीजीच्या वाढत्या किमतींबद्दल विचारले असता, त्यांनी मोफत लसी, राशन आणि गरीबांनाही दोष दिला!
कुतुब मिनार परिसरातील
27 मंदिरांची पुनर्बांधणी करा
विश्व हिंदू परिषदेकडून कुतुबमिनार संकुलातील प्राचीन मंदिरांची पुनर्बांधणी करून, तेथे हिंदू विधी आणि प्रार्थना पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल आणि संघटनेच्या अन्य नेत्यांनी कुतुबमिनार परिसराला भेट दिल्यानंतर वरील मागणी केली आहे. आम्ही प्रमुख भागांची पाहणी केली आणि हिंदू देवी-देवातांच्या मूर्तींची अवस्था मन हेलवणारी होती. कुतुबमिनारला २७ मंदिरांना उध्वस्त केल्यानंतर मिळालेल्या साहित्याने बनवले गेले होते.
बंगळुरुचा गोलंदाज हर्षल
पटेलच्या बहिणीचे निधन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शनिवारी दणदणीत विजय नोंदवत मुंबईला धूळ चारली. बंगळुरुने हा विजय सात गडी राखून मिळवला. या विजयानंतर बंगळुरु संघ गुणतालिकेत थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दरम्यान संघ या विजयाच्या आनंदात असतानाच आता बंगळुरुचा खास गोलंदाज हर्षल पटेलवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बहिणीचे निधन झाल्यामुळे हर्षल पटेलला सध्या आयपीएल सोडावा लागला आहे. हर्षल पटेल बायोबबलच्या बाहेर पडला आहे.
श्रीलंकेच्या माजी पंतप्रधानांचे राजपक्षे सरकारवर गंभीर आरोप
श्रीलंकेचे माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सध्याच्या सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज श्रीलंकेची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती खड्ड्यात गेल्याचे ते म्हणाले. सध्याच्या संकटासाठी त्यांनी थेट देशाच्या सरकारला जबाबदार धरत म्हटले की गोटाबाया राजपक्षे यांच्या सरकारने नागरिकांना अन्नासाठी रांगेत उभं केलंय. रानिल विक्रमसिंघे म्हणाले, माझ्या काळात असे आर्थिक संकट कधीच आले नाही. श्रीलंकेत आमचे सरकार असताना लोकांना त्यांच्या मूलभूत गोष्टी खरेदी करण्यासाठी कधीही रांगेत उभे राहावे लागले नाही.
सिल्व्हर ओक वरील हल्ला प्रकरण, आणखी एका पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी
एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शुक्रवारी शरद पवारांच्या सिल्वर ओक घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी आक्रमक होत दगडफेक आणि चप्पलही फेकली. या प्रकरणात पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेवर सुद्धा प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर आता पोलीस अधिकाऱ्यांच्या उचलबांगडीला सुरुवात झाली आहे. काल डीसीपींची बदली झाल्यानंतर आता आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली आहे.
सिल्वर ओकवरील हल्ल्या प्रकरणात गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालानंतर दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. गावदेवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजभर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. राजभर यांची आता दक्षिण मुंबई कंट्रोल रूम येथे बदली करण्यात आली आहे.
SD social media
98506 03590