इसिस दहशवादी संघटनेसोबत संबंध, पुण्यात तरुणाला अटक

पुणे शहरातील वानवडी परिसरात ‘इसिस’ (ISIS) या दहशवादी संघटनेसोबत संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) वानवडीत एका घरात छापा मारला आहे. याप्रकरणात एकाची चौकशी करण्यात आली. तसेच काही कागदपत्रे आणि इलेक्ट्राॅनिक्स वस्तू असे साहित्य जप्त करण्यात आले.तल्हा लियाकत खान (वय ३८) वास्तव्यास आहे.
इसिसशी संबंध असल्याचा संशयावरून एनआयएच्या पथकाने खान याच्या घरावर छापा टाकून कारवाई केली. खान याच्या घरातून कागदपत्रे आणि इलेक्ट्राॅनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या असून, या प्रकरणात खान याची चौकशी सुरू असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. इसिस देशभरात घातपात करण्याच्या तयारीत आहे. यातूनच विविध भागात छापेमारी सुरु आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आल्याचे वृत्त स्थानिक वर्तमानपत्रांनी दिले आहे.

गेल्या तीन दिवसापासून एनआयएचे पथक पुण्यात तपास करीत आहे. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, तल्हा खान याचा ‘इसिस’शी संबंध असल्याचा संशय असल्याने, एनआयएच्या पथकाने त्याच्या वानवडीतील घरात छापा टाकून काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॅानिक्स वस्तू जप्त केल्या. याप्रकरणात खान याची चौकशी सुरू असल्याची माहिती ‘एनआयए’कडून देण्यात आली आहे.

देशाच्या वेगवेगळ्या भागातून आतापर्यत अब्दुला बासित, सादिया अन्वर शेख, नबील सिद्दीक खत्री, अब्दुर रहमान ऊर्फ डाॅ. ब्रेव्ह यांना अटक केली, या सहा जणांच्या विरोधात एनआयएने न्यायालयात दोषाराेपपत्र दाखल केले आहे. छापेमारी करत असताना राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष विभागाने इसिससाठी काम करणाऱ्यासाठी सेल स्थापन करून त्याद्वारे भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून इसिसच्या विचारसरणीचा प्रचार करणे, हे काम या गटाचे होते. शस्त्रे गोळा करण्यासाठी, निधी उभारण्यासाठी आणि हत्या घडवून आणण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचा आरोप दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.