बऱ्याचदा आपल्या शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात असं झाल्यास जास्त त्रास होतो. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. अनेक वेळा शरीरात अशक्तपणाचा त्रास होत असतो, तेव्हा आहारात बदल केल्याने समस्या सुटू शकते. पण अनेकदा काय खावं हे समजत नाही. डॉक्टर अनेक भाज्या आणि फळांविषयी सांगत असतात, ज्यामुळे रक्तवाढीला मदत होते. यासोबच आम्ही तुमच्यासाठी काही प्रकारच्या ज्यूसची माहिती घेऊन आलो आहोत, जे प्यायल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होऊ शकते.
1. द्राक्षांचा रस
झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, तुम्हाला माहीत आहे का की, द्राक्षाचा रस रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त आहे? उन्हाळ्यात हा रस शरीराला थंड ठेवण्यास आणि हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतो. तुम्ही संपूर्ण द्राक्षे खाऊ शकता किंवा त्याच्या रसात काळं मीठ टाकून पिऊ शकता.
2. कोरफडीचा रस
कोरफडीचा ज्यूस ही एक अतिशय अद्भुत औषधी वनस्पती आहे. केसांपासून ते त्वचेसाठीही हे फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, रोज एक ग्लास कोरफडीचा रस प्यायल्यानं रक्त शुद्ध होतं आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं.
3. आमरस
फार कमी लोकांना माहीत असेल की, आंबे खाल्ल्याने रक्तवाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. सध्या उन्हाळ्यात आंबे सहज उपलब्ध आहेत. आंबे खाल्ल्यानं किंवा आमरस प्यायल्यानं रक्त वाढू शकतं.
4. बीटचा रस रोज प्या
अॕनिमिया झाल्यास डॉक्टर अधिकाधिक बीट खाण्याचा सल्ला देतात. बीटरूट कच्चं किंवा शिजवून दोन्ही प्रकारे खाण्याचा होतो. त्यातही कच्चं बीट चावून खाणं सर्वांत चांगलं. पण याचा ज्यूस करून पिण्याचाही नक्कीच फायदा होईल. हे चार प्रकारचे ज्यूस तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. sdnewsonline त्याची हमी देत नाही.)