काँग्रेससोबत चाललेल्या वाटाघाटींमुळे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर चर्चेत आले होते. काँग्रेससोबत चर्चा फिसकटल्यानंतर त्यांनी विविध निवडणूकविषयक मुद्द्यांवर मतं व्यक्त केली आहेत. आता त्यांचं 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य समोर आलं आहे.
प्रशांत किशोर म्हणाले, निवडणुकीत कोणतीही तिसरी-चौथी आघाडी भाजपला हरवू शकत नाही. भाजपला हरवायचं असेल तर, दुसरी आघाडीच असा करिष्मा करू शकते, असं ते म्हणाले.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर उर्फ पीके म्हणतात की, निवडणुकीत कोणतीही तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला पराभूत करू शकत नाही. जर भाजपला हरवायचे असेल तर दुसरी आघाडीच असा करिष्मा करू शकते. त्यामुळे भाजपला पराभूत करण्यासाठी आणखी एक मजबूत आघाडीच उभी राहणं आवश्यक आहे. म्हणजेच, राजकीय आणि संघटनात्मकदृष्ट्या भाजपइतकाच तुल्यबळ स्पर्धक भाजपला हरवू शकतो, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुका 2024 बद्दल मतं व्यक्त केली. भाजपचा पराभव करायचा असेल, तर त्यासाठी दुसरी आघाडी प्रबळपणे उभी करावी लागेल, असंही ते म्हणाले.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसीला तिसरी आघाडी म्हणून उदयास येण्यासाठी ते मदत करत आहेत का, असं जेव्हा पीके यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, “या देशात कोणतीही तिसरी किंवा चौथी आघाडी निवडणूक जिंकू शकते यावर माझा विश्वास नाही. आम्ही भाजपला पहिली आघाडी मानत असू तर मग त्यांना पराभूत करण्यासाठी तेवढ्याच ताकदीची दुसरी आघाडी असायला हवी. कोणत्याही पक्षाला भाजपचा पराभव करायचा असेल तर, त्यांना दुसरी आघाडी म्हणून मजबूत व्हावं लागेल. तरच, हे शक्य होईल.
काँग्रेस हा फक्त दुसरा मोठा पक्ष, आघाडी नव्हे
आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात पीके म्हणाले की, मी काँग्रेसला दुसरी आघाडी मानत नाही. त्यांच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष हा फक्त देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे.