खाद्य तेलाच्या किमती
वाढण्याची शक्यता
भारतीय बाजारपेठेत खाद्य तेलाचे दर सध्या प्रति लिटर १७० ते १८० रुपयांवरून २०० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर ऑईल इंडस्ट्रीज अँड ट्रेडच्या मते, दरवर्षी भारत सुमारे २५ दशलक्ष लिटर खाद्यतेल वापरतो. देशांतर्गत उत्पादनातून, भारताला या आवश्यकतेपैकी केवळ ९० लाख लिटरची पूर्तता करता येणार आहे. उर्वरित १.४० किंवा १५ अब्ज लिटर खाद्यतेलसाठी भारताला अर्जेंटिना, कॅनडा, मलेशिया, ब्राझिल, दक्षिण अमेरिकन देशांवर अवलंबून आहे.
सीजीएसटी कायद्यात
बदल करण्यात येणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी वार्षिक परतावा जमा करण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्यात येणार असल्याचे सांगितले. अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, रिकॉन्सिलिशन स्टेटमेंट स्वप्रमाणिकृत करण्याच्या दृष्टिने सीजीएसटी कायद्यात बदल करण्यात येणार आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात २ कोटी रुपये आर्थिक उलाढाल असलेल्या कर्मचार्यांना वार्षिक कर भरण्याची सोय यावर्षीही कायम राहणार आहे. ज्या व्यावसायिकांची उलाढाल ५ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्यांना २०२० २१ वर्षासाठी रिकॉन्सिलेशन स्टेटमेंट द्यावे लागणार आहे. इतकेच नव्हे, करदाते प्रलंबित परतावा भरू शकतील.
गुगलकडून एक नवे फिचर
कार्यान्वित करण्यात येणार
गुगलकडून एक नवे फिचर कार्यान्वित करण्यात येणार आहे. युजर आपल्या अकाउंटमधून ई-मेलमधील फोटो थेट Google Photo मध्ये सेव्ह करू शकणार आहेत.
गुगलच्या या नव्या अपडेटला सेव्ह टू फोटो बटन च्या नावाने ओळखले जाईल. सध्या Gmail चे नवे सेव्ह टू फोटो फिचर फक्त JPEF फॉर्मेटमध्ये उपलब्ध असेल. Gmail युजर्स, गुगल वर्कप्लेस, G Suite बेसिक, G Suite बिजनेस ग्राहकांसाठी येत्या काही आठवड्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नव्या फिचरला सध्याच्या Add to Drive बटनमध्ये ठेवले जाईल. जिथे ई-मेलच्या फोटोला प्री-व्ह्यूच्या स्वरूपात दाखविले जाते.
भारतात 5G ट्रायलसाठी टेलिकॉम
आपरेटर्सला स्पेक्ट्रम वाटपाचे काम सुरु
दूरसंचार विभागाने भारतात 5G ट्रायलसाठी टेलिकॉम आपरेटर्सला स्पेक्ट्रम वाटपाचे काम सुरु केले आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगलोर, गुजरात, हैदराबा मोठ्या शहरांमध्ये 5जी चे ट्रायल होणार आहे. टेलिकॉम आपरेटर्सला पंजाब, हरियाणा आणि केंद्र शासीत प्रदेश चंदिगढसाठी स्पेक्ट्रम वितरित करण्यात आले आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आपरेटर्सला 700Mhz बँड, 3.3-3.6Ghz बँड आणि 24.25-28.5 Ghz बँड चे स्पेक्ट्रम वेगवेगळ्या लोकेशनच्या अनुशंगाने वितरित करण्यात आले आहे.
राज्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन
स्वतः खरेदी करावे : केंद्र सरकार
करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी मागच्या दोन महिन्यात वाढती रुग्णसंख्या आणि अपुऱ्या वैद्यकीय उपकरणांमुळे मृतांचा आकडा नकोसे विक्रम प्रस्थापित करत होता. तसेच ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनी मागणीही वाढली होती. उत्पादन घटल्याने रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणं कठीण झालं आहेत. त्यामुळे केंद्र सरकार राज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करत होती. मात्र आता केंद्र सरकारने राज्यांना थेट कंपनीकडून इंजेक्शन खरेदी करावे असं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
शहीद मेजर विभूती ढौंढियाल यांची
पत्नी निकिता सैन्यदलात सहभागी
शहीद मेजर विभूती ढौंढियाल यांची पत्नी निकिता ढौंढियाल या सैन्यदलात सहभागी झाल्या आहेत. दु:खाला कवटाळून न बसता निकिता यांनी मोठ्या जिद्दीने सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या दिशेने प्रयत्न करत सैन्यदलात दाखलही झाल्या. सैन्यदलातील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आज त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट पदाचे स्टार्स त्यांच्या खांद्यावर चढवण्यात आले.
पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला
ममता बॅनर्जी यांची दांडी
पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये आलेल्या ‘यास’ चक्रीवादळात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी मोदींनी कोलकातामध्ये बैठक बोलावली होती. त्या बैठकीला ममतांनी दांडी मारल्यामुळे नवा वाद उद्भवला आहे. राज्य संकटात असताना राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ममता बॅनर्जी संकटाच्या काळात राजकारण करीत असल्याचा थेट आरोप केला आहे. ममता यांचे वागणे दुर्दैवी आहे. ममता यांचा अहंकार जनकल्याणाच्या आडवा येत आहे, अशी टिका अमित शहा यांनी केली आहे.
एचडीएफसी बँकेला रिझर्व बँकेने
ठोठावला १० कोटी रुपयांचा दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेला १० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. खासगी क्षेत्रातील बँकेला बँकिंग रेगुलेशन कायद्याच्या कलम दोन आणि कलम आठमधील तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. केंद्रीय बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरबीआय कायद्याअंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खासगी क्षेत्रातील बँकेला हा दंड ठोठावला आहे. २८ मे रोजी जारी केलेल्या आदेशात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, नियामक अनिवार्यतेचे पालन केल्याने ही कारवाई केली गेली आहे.
आयपीएलचा उर्वरित
हंगाम यूएईत होणार
सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयपीएलचा उर्वरित हंगाम यूएईत होणार असून सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात हे सामने खेळवण्यात येतील. या महिन्यात भारतातील पावसाळ्याचा विचार करता बीसीसीआयने आयपीएलचा उर्वरित हंगाम यूएईत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. आज बीसीसीआयची विशेष बैठक घेण्यात आली. यात सदस्यांनी आयपीएल पुन्हा सुरू करण्यास एकमताने सहमती दर्शवली. त्यानंतर युएईमध्ये सामने खेळवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
आयएमएनं दिले बाबा रामदेव यांना
खुल्या चर्चेचं आव्हान
इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA कडून रामदेव बाबांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी आयएमएनं केंद्र सरकारला पत्र लिहिण्यासोबतच रामदेव बाबा यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे आयएमएच्या केंद्रीय मंडळाकडून रामदेव बाबांनी त्यांचं वक्तव्य पूर्णपणे मागे घेण्याची मागणी केली जात असताना आता उत्तराखंड आयएमएनं थेट रामदेव बाबांनाच खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. रामदेव बाबांनी डॉक्टरांना उद्देशून जवळपास २५ प्रश्नांची यादी जाहीर केली होती. आता उत्तराखंड आयएमएकडून हे आव्हान देण्यात आलं आहे.
मराठा आरक्षणासाठी खासदारकी
सोडण्याची तयारी : संभाजीराजे
मराठा आरक्षणावर संभाजीराजे छत्रपतीआक्रमक झाले असून, त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारला इशारा दिलाय. तर दुसरीकडे त्यांनी मराठा आरक्षणासाठी भाजपनं दिलेली खासदारकी सोडण्यास तयार असल्याचं बोलून दाखवलंय. त्यावरूनच आता भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी संभाजीराजे छत्रपती यांना सबुरीचा सल्ला दिलाय.
योग्य व्यक्तींना भेटल्यास आरक्षणाचा मुद्दा सुटेल
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजीनामा देऊ नये, योग्य व्यक्तींना भेटल्यास आरक्षणाचा मुद्दा सुटेल, असंही नारायण राणे म्हणालेत.
भारतातील लसीकरणाची प्रक्रिया
यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल
संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात लसीकरणाचा वेग अतिशय संथ असतानाही भारतातील लसीकरणाची प्रक्रिया यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच १०८ कोटी लोकांना लसीचे २१६ कोटी डोस देण्यासाठी रोडमॅप सादर केला आहे, असेही जावडेकर म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी यांनी मोदींवर केलेल्या आरोपालाही जावडेकर यांनी प्रत्युत्तर दिले.
औरंगाबादेत म्युकरमायकोसिसने
आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू
औरंगाबादेत म्युकरमायकोसिसचा विस्फोट झालाय. म्युकरमायकोसिसने आतापर्यंत 53 जणांचे प्राण गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर म्युकरसायकोसिस रुग्णांची संख्याही तब्बल पावणे सहाशेवर जाऊन पोहोचलीय. खाजगी रुग्णालयांकडून आतापर्यंत रुग्ण आणि मृतांच्या आकड्यांची लपवाछपवी सुरु होती. मात्र आरोग्य यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार म्युकरमायकोसिसने 53 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलाय.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील
अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन कोंडीत सापडलेल्या ठाकरे सरकारला एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे.
पुण्यात आता डेंग्यूचे संकट,
पाण्यात आढळल्या अळ्या
मावळच्या देहूगावात कोरोनाच्या प्रकोपानंतर आता डेंग्यूचा धोका निर्माण झाला आहे. देहूगावात नुकतेच डेंग्यूचे 7 रुग्ण आढळून आले. देहूगावातील ओमकार सोसायटीमध्ये एका पाण्याच्या टाकीत आणि जवळच बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमधी साठवलेल्या पाण्यातही डेंग्युच्या अळ्या आढळून आल्या. या घटनेनंतर स्थानिक आरोग्य प्रशासन सर्तक झाले आहे.
आरोग्य विभागाकडून तात्काळ देहूगाव परिसरात कंटेनर तपासणी सर्व्हे करण्यात आला. यावेळी साठवलेल्या पाण्याचे स्रोत शोधून ते नष्ट करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने देहूगाव नगरपंचायतीला ड्राय डे पाळण्याबाबत पत्र दिले आहे.
SD social media
9850 60 3590