केंद्र सरकार म्हणते तिसरी लाट येणार, काळजी घ्या…

कोरोना व्हायरसची दुसरी लाट आता काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. पण कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकराक आहे. कारण देशात तिसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत. नीती आयोगाचे सदस्य व्ही.के सारस्वत यांच्या म्हणण्यानुसार आपण कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात यशस्वी ठरलो आहोत. पण आता कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेतून बाहेर येण्यासाठी योग्य ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा तरुणांना अधिक धोका आहे. असं सांगितलं जात आहे. सारस्वत म्हणाले की, देशात कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य असल्याचे स्पष्ट संकेत रोग विशेषज्ञांनी दिले आहे. कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात लसीकरण जलद गतीने होणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

सारस्वत पुढे म्हणाले, ‘आतापर्यंत आपण चांगलं काम केलं आहे. त्यांमुळे कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत आहे.वैज्ञानिक आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांची मदत, ऑक्सिजन बँक, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी उद्योगांची स्थापना, ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी रेल्वे, विमानतळ, सैन्य दलांचा उपयोग केला जात आहे.’

देशात याआधी रोज 4 लाखांपेक्षा जास्त नव्या कोरोना रूग्णांची नोंद केली जात होती. पण आता तो सतत वाढणारा आकडा मंदावला आहे. आता रोज देशात जवळपास 1.3 लाख नव्या रूग्णांची नोंद होत आहे. शिवाय कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.